अन्य स्मार्टफोन कंपन्यांप्रमाणे Motorola नेही ‘अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही’ मालिका लाँच केली आहे. कंपनीने 32 इंचापासून 65 इंचापर्यंत सहा स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर 29 सप्टेंबरपासून या टीव्हींची विक्री सुरू होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अँड्रॉइड 9.0 वर हे सर्व टीव्ही कार्यरत असतील. यामध्ये एचडीआर फॉर्मेट आणि डॉल्बी व्हिजन स्टँडर्डचा सपोर्ट आहे. यात फ्रंट फायरिंग साउंडबार स्टाइल स्पीकर देखील आहे. विशेष म्हणजे या टीव्हींसोबत गेमपॅड देखील कंपनीकडून दिला जात आहे. याद्वारे युजर्स अँड्रॉइड टीव्ही प्लॅटफॉर्म आणि गुगल प्ले स्टोअरद्वारे गेम इंस्टॉल करुन टीव्हीवरच गेम खेळू शकतात. यासाठी वेगळ्या गेमिंग कंसोलचीही आवश्यकता नाही.

किंमत –

विविध स्क्रीन साइज आणि रिझोल्युशनचे टीव्ही या मालिकेत सादर करण्यात आलेत. मोटोरोला स्मार्ट टीव्हींची किंमत 13 हजार 999 रुपयांपासून सुरू होते, तर 64 हजार 999 रुपये इतकी या मालिकेतील सर्वात महागड्या टीव्हीची किंमत आहे. स्मार्ट टीव्हीच्या 32 इंच (एचडी 720 पिक्सल) व्हर्जनची किंमत 13,999 रुपये आहे. तर, 43 इंच (फुल-एचडी 1080 पिक्सल, 24,999 रुपये), 43 इंच (अल्ट्रा-एचडी 2160 पिक्सल, 29,999 रुपये), 50 इंच (अल्ट्रा-एचडी 2160 पिक्सल, 33,999 रुपये), 55 इंच (अल्ट्रा-एचडी 2160 पिक्सल, 39,999 रुपये) आणि 65 इंच (अल्ट्रा-एचडी 2160 पिक्सल, 64,999 रुपये) इतकी किंमत आहे.

आणखी वाचा : Xiaomi बाजारात आणले 4 नवे टिव्ही; जाणून घ्या काय आहे किंमत?

वनप्लसदेखील आपला स्मार्ट टीव्ही लवकरच लाँच करणार असून ‘अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल’मध्ये त्यांचे टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. यापूर्वीच शाओमीने देखील टीव्ही क्षेत्रात शानदार पदार्पण केलंय. मोटोरोलाच्या टीव्हीमुळे शाओमीच्या टीव्हींना आता तगडी टक्कर मिळणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart tv lineup with bundled gamepad android 9 0 launched by motorola know price and other features sas
First published on: 18-09-2019 at 09:57 IST