Social Media Day Top 12 Very Funny Indian Twitter Parody Accounts: सोशल नेटवर्किंगच्या जगात काय खरे काय खोटे ओळखता येणे तसे कठीणचं. पण त्यातही पॅरडी अकाऊण्टच्या नावाचा एक भन्नाट प्रकार अनेकांना भलताच आवडल्याचे दिसून येत आहे. खऱ्या लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने सुरु केलेली ही खोटी अकाउण्ट्स म्हणजे फूल ऑन धम्माल आणि मनोरंजनाचा डोस ठरत आहेत. कला, क्रिडा, राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील लोकांच्या नावे सुरु असणाऱ्या काही पॅरडी अकाऊण्ट आणि लोकप्रिय कॅरेक्टर्सच्या नावाने ट्विटर हे सर्वाधिक लोकप्रिय माध्यम गाजवणारी काही खास अकाऊण्टस…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोल्फ गांधी
राहुल गांधीच्या नावाचा आणि फोटोचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या या ट्विटर अकाऊण्टला ३ लाख १६ हजारहून अधिक फॉअर्स आहेत. या अकाऊण्टला अनेक सेलिब्रिटीही उत्तरे देतात. राजकीय कोपरख्या मारण्यासाठी हे अकाऊण्ट लोकप्रिय आहे.

 

गब्बर सिंग
शोलेतला गब्बर जसा आजही लोकांच्या लक्षात आहे आहे तसेच हे अकाउण्टही नेटकऱ्यांना कायम लक्षात राहिल असेच आहे. कॅरेक्टच्या नावाने सुरु झालेल्या अकाउण्टपैकी हे सर्वाधिक लोकप्रिय अकाऊण्ट आहे. या अकाऊण्टला १३ लाख १९ हजारांवर फॉलोअर्स आहेत. उपहासात्मक, योग्य टायमिंग आणि हटके थिंकींगच्या जोरावर हे अकाउण्ट इतरांहून वेगळे ठरते.

सर रविंद्र जडेजा
खऱ्याखुरा रविंद्र जडेजा कधी इन तर कधी आऊट ऑफ फॉर्म असतो मात्र हा खोटावाला जडेजा टविटरवर कायमच इन फॉर्म असतो. त्याचे @SirJadeja हे अकाऊण्ट ट्विटरने सस्पेण्ड केले ज्याला ३ लाख ४० हजारच्यावर फॉलोअर्स आहेत. सध्याच्या त्याच्या ट्विटर अकाऊण्टला १ लाख ५ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.

डीजे बॉबी देओल
बॉली देओल आज जेवढा लोकप्रिय नसेल तितके त्याचे हे खोटे अकाऊण्ट नेटकऱ्यांमध्ये लोक प्रिय आहे. बॉबी देओलचीच मस्करी करणाऱ्या या अकाउण्टला १३ हजारांच्यावर फॉलोअर्स आहेत.


लोलेंद्र सिंग

धोनी जसा मैदानात उतरल्यावर काहीतरी घडणारच तसचं काहीतरी घडल्यानंतर हा लोलेंद्र तिरकस कमेन्ट करणारच असा नियमच झाला आहे. कमी अॅक्टीव्ह असूनही ३७ हजारांवर फॉलोअर्स या अकाउण्टला आहेत.

परेश रावल
बाबु भय्या हॅण्डलने चालणाऱ्या या खोट्या ट्विटर अकाऊण्टची खऱ्या परेश रावल यांनी अनेकदा स्तुती केली आहे. टू द पॉइण्ट आणि वर्माला घाव घालणारी मजेदार टिका या अकाउण्टवरून केली जाते. या अकाउण्टला ११ लाख ६० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ट्रेंडूलकर
ट्रेंडींग टॉपिक्सवर तिरकस कॉमेंट्री करणारे अकाउण्ट म्हणून या अकाउण्टकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे हे व्हेरिफाइड अकाऊण्ट आहे. तेंडूलकरचा स्ट्रेट ड्राइव्ह जितका पाहण्यासारखा होता तसेच या अकाउण्टवरील ट्विटही मीस न करण्यासारखे आहेत ११ लाख ८५ हजार चाहते या ट्रेंडूलकरला फॉलो करतात.

खाप पंचायत
अनेकदा खाप पंचायतीने अनेक निर्णय तरूणाईला खटकतात मग याच तिरकस निर्णयांना आडवा छेद देत त्यांच्यावर चिमटे काढण्यासाठी तयार केलेले हे अकाउण्ट. कमी काळात या अकाउण्टला २० हजार ६०० हून अधिक जण फॉलो करू लागले आहेत.

अभिषेक बच्चन
१ लाख ७८ हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळवलेले या पॅरडी अकाउण्टला अनेकजण खरा अभिषेक म्हणून टॅग करतात. ज्यावर हा अभिषेक भन्नाट उत्तरे देतो.

सर इशान शर्मा
ऑनल फिल्ड दमदार कामगिरी करणाऱ्या इशानच्या नावाने सुरु कऱण्यात आलेल्या या ट्विटर अकाऊण्टचा नेटकऱ्यांचा चांगला पाठिंबा आहे. म्हणूनच या अकाऊण्टला ९७ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.

विरेंद्र स्वॅग
साक्षी मलिक के गले मे मेडल कितना शोभा दे रहा है हे वाक्य अजरामर करणारे ट्विटर हॅण्डल खोट्या सेहवागचे आहे. १३ हजारांहून अधिक फॉलोअर्स असणारे हे पॅरोडी अकाऊण्ट तुफान फटकेबाजी करतं अगदी खऱ्याखुऱ्या विरू सारखं.

अल्लादिन
अल्लादिनच्या दिव्यातून जीन निघतो तसं या ट्विटर अकाऊण्टवरून हस्याचा पाऊस पडतो. ५२ हजारांवर फॉलोअर्स असणारे हे अकाउण्ट ताज्या घडामोडींवर टोमणा मारण्यासाठी लोकप्रिय आहे.

याशिवाय मार्क झुकेरबर्ग, अशिष नेहरा, केव्हिन पिटर्सन, नसिर जमशेद, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा यांच्या नावानेही पॅरडी अकाउण्ट असून त्यांनाही भन्नाट रिस्पॉन्स आहे.

संकलन – स्वप्निल घंगाळे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media day top 12 very funny indian twitter parody accounts
First published on: 30-06-2018 at 08:01 IST