अमेरिकी वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि सकस आहार महत्त्वाचे आहेत, पण त्याचबरोबर सामाजिक संबंधही आरोग्यदायी जीवनशैलीसाठी महत्त्वाचे आहे.
पौगण्ड आणि प्रौढ अवस्थेच्या काळात जास्तीत जास्त आरोग्यदायी सामाजिक संबंध आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी उपयुक्त आहेत, असा दावा वॉशिंग्टन येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.
अभ्यासातील निष्कर्षांनुसार समाजशील जीवनशैलीचा शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त असण्याशी संबंध असून अतिरिक्त चरबीने आलेला लठ्ठपणा, सूज आणि उच्च रक्तदाबासोबतच हृदयरोग, अर्धागवायू आणि कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांवरही ठोस उपाय असल्याचे म्हटले आहे.
संशोधनातील या तथ्यांनुसार पौगण्डावस्थेतील मुलांना आणि युवा वर्गाला दृढ सामाजिक संबंधांसोबतच इतरांशी संवाद निर्माण करण्याच्या सामाजिक कौशल्यांनाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाचे प्राध्यापक म्युलान हॅरिस यांनी व्यक्त केले.
संशोधकांच्या एका गटाला असे आढळून आले की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सुरुवातीच्या टप्प्यात आणि वृद्धापकाळात असणारे सामाजिक संबंध हे आरोग्यासाठी हितकारक आहेत. पौगण्डावस्थेत जर समाजापासून वेगळे राहण्याची आणि एकलकोंडा असल्याची मानसिकता मुलांना त्रासदायक असते.
सामाजिक एकीकरण हे निश्चितच पोटाच्या लठ्ठपणापासून संरक्षण करते. वृद्धापकाळात सामाजिकदृष्टय़ा सक्रिय नसणे हे मधुमेहाचा वाढणारा धोका आणि उच्च रक्तदाबापेक्षाही अधिक घातक असल्याचे म्हटले गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संशोधकांनी अमेरिकेतील पौगण्ड व प्रौढ अवस्थेतील व्यक्तींच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले. त्यांनी सामाजिक संबंधाच्या या संकल्पनेचे सामाजिक एकीकरण, सामाजिक आधार आणि सामाजिक ताण अशा तीन गटांत विभागणी केली.
सामाजिक संबंधांचा अभाव असणाऱ्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह आणि मानसिक ताण असल्याचे या सर्वेक्षणात लक्षात आले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social relations is important for healthy lifestyle
First published on: 11-01-2016 at 01:31 IST