शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला मात देत मेंदूपर्यंत पसरणाऱ्या प्राणघातक बुरशीजन्य संसर्गाला आळा घालण्याचा नवा मार्ग संशोधकांनी आढळला आहे. इंग्लंडमधील शेफिल्ड विदय़ापीठ आणि अमेरिकेतील हार्वर्ड वैदय़कीय शाळेतील संशोधकांनी क्रिप्टोकोकोसिस या आजाराचा अभ्यास केला. हवेतून पसरणाऱ्या जंतूंमुळे या आजाराची माणसांना आणि प्राण्यांना लागण होते. या आजारामुळे फुप्फुसांचा संसर्ग होतो. त्याचप्रमाणे पांढऱ्या रक्तपेशींद्वारे हा आजार मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. याला आळा घालण्यासाठी संशोधकांना पांढऱ्या रक्त पेशींचे वर्तन नियंत्रित करण्याचे संकेत आढळले आहेत. रोगजनकांना पांढऱ्या रक्तपेशींमधून काढून टाकण्यासाठी ईआरके-५ या पेशी रेणूला प्रवृत्त केले जाऊ शकते. मॅक्रोफेज या पांढऱ्या पेशी सर्वप्रथम संसर्गाच्या प्रतिसाद देतात असे बर्मिगहॅम विदय़ापीठातील रॉबिन मे यांनी सांगितले. मॅक्रोफेज या पेशी आक्रमण करणाऱ्या जिवाणू किंवा बुरशीला ओळखून त्यांना नष्ट करतात आणि शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला सतर्क करण्याचे काम पार पाडतात. पण क्रिप्टोकोकोसिस यांसारख्या आजारांमध्ये जिवाणू हे पांढऱ्या पेशींचा प्रतिकार करण्यास उत्क्रांत होत असून ते पांढऱ्या पेशींचा वापर शरीरात पसरण्यासाठी करून घेतात, असे मे यांनी सांगितले. आम्हाला ईआरके-५ नामक पेशीरेणू आढळले असून यांना रोगजनकांना पांढऱ्या रक्तपेशींमधून काढून टाकण्यास प्रवृत्त करता येते. झेब्रामास्यात ईआरके-५ला आळा घातल्याने व्हामोसायटोसिसचे पांढऱ्या रक्त पेशीतील प्रमाण वाढले असून यामुळे प्राणघातक बुरशीजन्य संसर्गाचा मेंदूपर्यंत होणाऱ्या प्रसाराला रोखता येत असल्याची माहिती मे यांनी दिली. हा शोध जर्नल सायन्स अडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solution found on brain damage
First published on: 19-08-2017 at 01:19 IST