SSC Recruitment 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘फेज ८’ साठी विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन आणि ऑपलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० पर्यंत आहे. २४५ विभागांमध्ये ११५७ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्र उमेदवारांची computer-based परीक्षा १० जून २०२० रोजी होणआर आहे. या परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांची स्कील टेस्ट घेण्यात येणार आहे.  या परीक्षेत ओबीसी उमेदवारांसाठी ३५ टक्के तर एससी आणि एसटी उमेदवारांसाठी २५ टक्केंची अट ठेवण्यात आली आहे.

   SSC Phase 8 Recruitment 2020 Notification: परीक्षेचं स्वरूप

computer-based परीक्षेत २०० प्रश्न विचारण्यात येतात. यासाठी एक तासांचा अवधी देण्यात येतो. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात. पण चुकीच्या उत्तराला 0.50 गुण कमी होतात.

आणखी वाचा : महत्वाची बातमी : दहावी पास असाल तर रेल्वेत नोकरीची संधी; परीक्षेविना होणार निवड 

या पदांसाठी पात्र उमेदवारचं वय १८ पूर्ण असायला हवं.  तसेच पदांनुसार वयांमध्ये सूट देण्यात आली आहे. शैक्षणिक अटींचा विचार केल्यास उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातूनन बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी अशी अट आहे. तर काही पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी उतीर्ण असावी अशी अट ठेवण्यात आली आहे.

परीक्षा फी:-
Gen/OBC : १०० रूपये
SC/ ST/ Women/Ex-Servicemen: फी नाही.

अर्ज दाखल करण्यासाठी इथं क्लीक करा –

दरम्यान, केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली येणारी सहा लाख ८३ हजार पदं रिक्त आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ही पदं भरण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. UPSC मार्फत ४३९९ आणि SSC मार्फत १३९९५ पदं केंद्र सरकार लवकरच भरणार आहे. मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आरआरबी अंतर्गत १,१६,३९१ पदे भरली जाणार आहेत.