बैठे काम करणाऱ्या व्यक्ती हळूहळू लठ्ठ होतात. त्यामुळे बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना व्यायाम करण्याचे सल्ले डॉक्टर देतात. अमेरिकेच्या संशोधकांनी असे सिद्ध केले आहे की, बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना ज्याप्रमाणे लठ्ठपणाचा धोका असतो, त्याच्या विसंगत अवस्था उभ्याने काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये असते. दररोज किमान सहा तास उभे राहणाऱ्या व्यक्तीला लठ्ठपणाचा धोका नसतो, असा दावा अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या डॉक्टरांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतत बसणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. सातत्याने टीव्ही पाहणारे आणि संगणकावर काम करणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य त्यामुळेच बिघडते, त्यांच्यात लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. पण सातत्याने उभे राहणाऱ्या व्यक्तीमध्ये लठ्ठपणाचा धोका नसतो का, यावर हे संशोधक संशोधन करत होते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या आहार संशोधन विभागाचे संचालक डॉ. केरेम शुवाल यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू होते.
संशोधकांच्या या पथकाने सातत्याने उभे राहणाऱ्या सात हजार जणांच्या चयापचय प्रक्रिया आणि वाढणारे वजन यांचा २०१० ते २०१५ या पाच वर्षांत अभ्यास केला. या व्यक्तींचे बॉडी मास इंडेक्स (उंचीनुसार असलेले वजन), शरीराची वाढणारी चरबी आणि कंबरेचा घेर यांचे सातत्याने मोजमाफ करण्यात आले.
उभे राहण्याचा आणि चयापचय क्रियेचा संबंध असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. सातत्याने बसल्याने पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात, मात्र उभे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये पचनक्रिया सुलभ होते. उभे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये मधुमेह व हृदयविकार यांचे प्रमाणही कमी आढळले आहे, याचे कारण त्यांची सुलभ पचनक्रिया असल्याचे संशोधकांनी सांगितले. उभे राहिल्याने शरीराची चरबी ३२ टक्क्यांनी घटते, असा दावा या संशोधकांनी केला.
तुम्ही काम करत असलेल्या वेळेपैकी निम्मा वेळ उभे राहत असाल, तर तुम्हाला ५९ टक्के लठ्ठपणाचा धोका नाही आणि महिलांमध्ये तर हा धोका ४७ टक्क्यांनी कमी असतो, असे डॉ. शुवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stand up avoid obesity
First published on: 19-11-2015 at 02:11 IST