How to sleep fast: आजच्या काळात वेगाने बदलणारी जीवनशैली आणि आहार यांमुळे अनेकांना रात्री नीट झोप येत नाही. खरं तर जास्त मानसिक ताण, मोबाईल स्क्रीनचा अत्याधिक वापर व अनियमित दिनचर्या यांमुळे ही समस्या उद्भवू लागली आहे. जर तुम्हीही रात्री झोपल्यानंतर लगेच झोप येत नसेल, तर काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. या लेखात आम्ही तुम्हाला तीन सोप्या उपायांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही झोपण्यापूर्वी पाळू शकता. त्यामुळे तुमची निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होईल.
झोपण्यापूर्वी मोबाईल वापरू नका
आजकाल बहुतेक लोक मोबाईल पाहिल्याशिवाय झोपत नाहीत. अनेक जण अंथरुणावर पडून रील्स पाहणे,गाणी ऐकणे, चित्रपट पाहण्यासाठी आपला वेळ वाया घालवतात. अशा परिस्थितीत स्क्रीन टाइम कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉप यांसारख्या डिजिटल स्क्रीनपासून दूर राहा. त्या व्तिरिक्त तुम्ही काही वेळ एखादे पुस्तक वाचू शकता.
कोमट पाणी प्या
झोपण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे आधी तुम्ही एक कप कोमट पाणी किंवा कोणताही हर्बल चहा पिऊ शकता. त्यामुळे शरीराला आराम मिळून, चांगली झोप येते. कॅफिन किंवा जास्त साखरेमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.
ध्यानधारणा करा
रात्री झोपण्यापूर्वा अंथरुणावर बसून १०-१५ मिनिटे हलका व्यायाम, ध्यानधारणा, श्वासासंबंधित व्यायाम करा यांमुळे तुमचे मन शांत होऊन, झोपही चांगली येईल.