वाटाणा हा जवळपास सर्वांना खायला आवडतो. वाटाण्याला हिंदीमध्ये मटर असेही म्हणतात. समोसा, मटर पनीर, आलू मटर, मटर पराठा असे विविध पदार्थ आहे ज्यासाठी आवर्जून वाटाणा वापरला जातो. वाटाणा खाण्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात वाटाण्याचे उत्पादन जास्त प्रमाणात असते तेव्हा त्याचा भाव देखील कमी असतो. वर्षभर सहसा वाटाणा बाजारात दिसत नाही आणि मिळाला तरी फार महाग असतो. त्यामुळे अनेदा लोक गोठवलेले वाटाणे वापरतात. पण तुम्हाला माहितीये का तुम्ही घरच्या घरी देखी वाटाणे गोठवू शकता. होय. तुम्ही वाटाणे गोठवून वर्षभर वापरू शकता. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की करायचे तरी कसे?

तुम्हालाही वाटाणा आवडत असेल आणि वर्षभर तुम्हीला तो साठवून ठेवायचा असेल तर भन्नाट ट्रिक जाणून घ्या. योग्यरित्या गोठवून हिरवे वाटाणे १ वर्षापर्यंत साठवण्याचा सर्वोत्तम आणि अगदी सोपा मार्ग आहे जो nehadeepakshah नावाच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये वाटाणा साठवण्याआधी काय काय करायचे याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे.

हेही वाचा – तुळशीचे रोप हिवाळ्यात वारंवार सुकतेय का? मग या सोप्या ट्रिक्स वापरून पाहा, मग बघा कमाल!

वाटाणे वर्षभर कसे साठवून ठेवावे?

१. सॉसपॅनमध्ये ३ ते ४ लिटर पाणी उकळवा आणि गरम झाल्यावर त्यात १ चमचा मीठ, २ चमचे साखर आणि १ चिमूटभर बेकिंग सोडा घाला (सोडा ऐच्छिक आहे पण रंग दिर्घकाळ टिकून राहील.)
२. एकदाच पाणी गरम झाल्यावर त्यात हिरवे वाटाणे टाका आणि फक्त २ मिनिटे शिजवा.
३. हे ताबडतोब बर्फाच्या थंड पाण्यात टाका. हिरवे वाटाणे पूर्ण शिजवायचे नाही, यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत जे चांगले दिसत नाहीत.
४. कोरडे करणे खूप महत्वाचे आहे. तुमचे हिरवे वाटाणे एकत्र चिकटू नये साठी हे महत्त्वाचे आहे कारण गोठल्यावर वेगळे राहतील

हेही वाचा – कचरा समजून लसणाची साल फेकून देताय? ‘ही’ चूक करू नका कारण…

वाटाणा गोठवताना मीठ, साखर आणि बेकिंग सोडा का वापरावे?

मीठ, साखर सह Blanching केल्यामुळे ते हिरव्या वाटाण्याची एन्झाइमॅटिक क्रिया थांबवते आणि ते गोठवण्यास मदत करते. बेकिंग सोडा हा पाण्याचे फक्त किंचित अल्कयुक्त pH मध्ये रुपांतरीत करतो ज्यामुळे वाटाण्याचा हिरवा रंग अधिक काळ टिकून राहातो

हेही वाचा – Kitchen Jugaad : हिवाळ्यात पाण्यात किंवा पिठात हात न टाकता कशी मळावी कणीक? जाणून घ्या भन्नाट ट्रिक, पाहा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही ट्रिक उपयूक्त आहे की नाही हे स्वत: वापरून पाहा.