थंडीच्या मोसमात लालचुटुक रंगाच्या स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आपल्याकडे महाबळेश्वर, पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. स्ट्रॉबेरी ही दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे त्याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी त्या फायदेशीर आहेत. म्हणूनच थंडीच्या मोसमात बाजारात येणारी स्ट्रॉबेरी ही भरपूर खावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्ट्रॉबेरीचे फायदे
– स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्याप्रमाणात असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा कमी होतो.
– स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रीक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात अधिक चमकदार होतात. तसेच हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.
– स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्‍सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.
– स्ट्रॉबेरी खाल्ल्यानं त्वचा तजेलदार होते, तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात.
– स्ट्रॉबेरीमधील ‘फोलेट’ हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.
– स्ट्रॉबेरीमुळे वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.
– स्ट्रॉबेरीत मँगेनिज हे खनिजद्रव्य आहे त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो, तसेच हाडं दुखण्याचा त्रासही कमी होतो म्हणून थंडीत स्ट्रॉबेरी भरपूर खावी.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strawberries benefits in marathi and it can whiten teeth also
First published on: 03-01-2018 at 11:50 IST