स्ट्रॉबेरी हे असे एक फळ आहे ज्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. या आंबट-गोड फळामध्ये जळजळ कमी करणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे इत्यादी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु अनेक लोकांना असं वाटत की यामुळे वजन वाढू शकते. परंतु हे वजन कमी करण्यास मदत करू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्ट्रॉबेरी जीवनसत्त्वे, शून्य कोलेस्टेरॉल, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, चरबी मुक्त आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. शिवाय, हे व्हिटॅमिन सीच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते. त्यात भरपूर फायबर आहे जे वजन वाढण्यास प्रतिबंध करते आणि पचनास मदत करते.

(हे ही वाचा: Skin Care: उन्हाळ्यात त्वचेला संसर्गापासून वाचवतो तुळशीचा पॅक; जाणून घ्या कृती)

आहारात कसे समाविष्ट करावे?

स्नॅक्स म्हणून स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येतो. तुम्ही ते सलाड म्हणूनही खाऊ शकता. तुम्ही ते ओट्स किंवा दह्यामध्ये घालूनही खाऊ शकता. तुम्ही लो फॅट मिल्क शेक बनवून पिऊ शकता.

(हे ही वाचा: Skin Care Tips: टॅनिंगने त्रस्त आहात? तर ‘या’ ३ टिप्स करा फॉलो)

स्ट्रॉबेरीचे अन्य फायदे

स्ट्रॉबेरी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास, टाइप २ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. यासोबतच हे पचनास मदत करते. याशिवाय स्ट्रॉबेरी त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strawberries can help to lose weight learn the benefits of this fruit ttg
First published on: 07-03-2022 at 17:06 IST