नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात हे तुम्ही नेहमी ऐकले असेल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. आजारी पडल्यानंतर लवकर बरे होण्यासाठी रुग्णाला नारळ पाणी दिले जाते. नारळ पाणी पिताना स्ट्रॉचा वापर केला जातो. पण स्ट्रॉचा वापर करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. स्ट्रॉमुळे शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या.

स्ट्रॉचे दुष्परिणाम

शरीरात केमिकल्सचा होतो समावेश

प्लास्टिकच्या वस्तु बनवताना केमिकल्सचा वापर केला जातो. स्ट्रॉ बनवतानाही प्लास्टिकचा वापर केला जातो, जेव्हा असे प्लास्टिक उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा त्यातील केमिकल्स वितळून नारळ पाण्यासह आपल्या शरीरात जातात. यामुळे हॉर्मोन्सवर वाईट परिणाम होतो.

आणखी वाचा: रोज चष्मा वापरल्याने नाकावर डाग पडले आहेत? ‘हे’ घरगुती उपाय वापरून मिळवा त्यापासून सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दातांचे नुकसान होते

स्ट्रॉ वापरून नारळ पाणी किंवा कोणतेही ड्रिंक्स प्यायल्याने प्लास्टिकमधील हार्मफुल कंपाउंट्स दात आणि इनामेलला स्पर्श करतात. यामुळे कॅविटी होण्याची शक्यता वाढते. यामुळे दात कमकुवत होतात, तसेच दातांमध्ये असह्य वेदनाही होऊ शकतात.

वजन वाढण्याची शक्यता

स्ट्रॉ वापरुन नारळ पाणी किंवा कोणतेही ड्रिंक प्यायल्याने खुप भूक लागल्यासारखे जाणवते. ज्यामुळे जास्त जेवण केले जाते. परिणामी वजन वाढण्याची शक्यता असते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)