लायन्सगेट प्ले ‘बिंजपास’ ऑफर: फक्त ९ रुपयांमध्ये सबस्क्रायबर व्हा!

सध्या प्लॅटफॉर्मवर हिंदी, मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि भोजपूरी या सहा भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध आहे.प्रेक्षकांच्या पसंतीनुसार कंटेटचे लोकलायजेशन केले जाते.

Lionsgate Play BingePass Offer
ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे

ग्लोबल कंटेंट लिडर स्टार्जची भारतातील स्ट्रिमींग सेवा असणार्‍या लायन्सगेट प्ले कडून ‘बिंजपास’ नावाच्या सर्वात आकर्षक डिलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नाविण्यपूर्ण ऑफरच्या माध्यमातून लायन्सगेट प्लेच्या आकर्षक लायब्ररीचा अमर्यादित अ‍ॅक्सेस फक्त ९ रुपयांच्या अविश्वसनीय किंमतीत ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यूजर्स या ऑफरचा मर्यादित कालावधीसाठी लाभ घेऊ शकतील. गुरुवार ५  ऑगस्ट ते रविवार ८  ऑगस्ट या कालावधीत ३० दिवसांचे सबस्क्रिप्शन मिळवता येऊ शकते. ब्रँडकडून अॅड कॅम्पेनसाठी  अभिनेत्री अनन्या पांडेचे सहकार्य घेण्यात आले आहे.

कसा लाभ घेता येईल या ऑफरचा?

लायन्सगेट प्ले नेहमीच त्यांचे वेगवेगळे शोज आणि प्रेक्षकांसाठी खास निवडलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून आपली लायब्ररी अधिकाधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करीत असते. बिंजपास ऑफरच्या माध्यमातून जे ग्राहक अजूनही या सेवेशी जोडले गेले नाहीत त्यांना हा अनुभव घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी http://www.lionsgateplay.com ला भेट देऊ शकता. ईमेल आयडी/नाव/फोन नंबरचा वापर करुन ५ ते ८ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत साईन अप करा आणि ९ रुपयांचे पेमेंट करा. युजरने अँड्रॉईड अ‍ॅप किंवा ब्राउजरद्वारे लॉग इन केल्यानंतर ते कोणत्याही स्मार्ट टीव्हीवरून, आयओएस डिव्हाइसवरुन साईन इन करु शकतील.

कोणते शो आहेत?

या प्लॅटफॉर्मवर अलिकडेच समीक्षकांनी गौरवलेले नॉर्मल पिपल, द पॅक्ट, रॅथ ऑन मॅन, द गोज राँग शो, सेड्यूस्ड: इनसाईड एनएक्सआयएम कल्ट, द गर्लफ्रेंड एक्सपिरीयन्स, होम इकॉनॉमिक्स यासारख्या टायटल्सचा प्रीमियर करण्यात आला आहे.  इंडियाज टॉप १०, व्हॉट मिलेनियल्स आर वॉचिंग, बिंज वर्थी बॉक्स सेट, लायन्सगेट प्ले ओरिजनल्स, फनी साईड अप, डेट नाईट, बॉलिवूड बिंज अँड थ्रीलर, क्वीनडोम, टॉलिवूड ब्लॉकबस्टर्स यासारख्या कोरीव मुव्ही प्लेलिस्टमधून लाखो लोकांनी पाहिलेले चित्रपट निवडून युजर्स त्यांचा आनंद घेऊ शकतात. लायन्सगेटकडून प्रत्येक शुक्रवारी त्यांच्या कंटेंट लायब्ररीचा विस्तार करण्यासाठी नवीन टायटल्स प्रदर्शित केल्या जातात. यासोबत प्रेक्षकांच्या पसंतीनुसार कंटेटचे लोकलायजेशन केले जाते. सध्या प्लॅटफॉर्मवर हिंदी, मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि भोजपूरी या सहा भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Subscribe for only rs 9 lionsgate play bingepass offer ttg

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या