चहाला राष्ट्रीय पेय म्हटलं, तर वावगं ठरू नये. कारण भेटायचं म्हटलं की, चहा हवाच. त्यात पाऊस असेल, तर चहाची तलफ होतेच… काही घरांमध्ये तर चहाशिवाय दिवसाची सुरूवातच होत नाही; असं असलं तरी चहाविषयी चर्चा ऐकायला मिळतात. चहाचे फायदे-तोटे किंवा चहा बनवण्याच्या पद्धती… चहा पावडर, साखर, दूध, पाणी असे घटक एकत्र करून चहा बनतो. मात्र, या व्यतिरिक्ती आपण आरोग्यदायी निरोगी ठेवण्यासाठी चहाचे वेगवेगळे प्रकारदेखील बनवू शकतो. चला तर मग पाहुयात चहाचे प्रकार

१) ग्रीन टी

ग्रीन टी हे जगभरात प्रसिद्ध असलेला चहा आहे. या ग्रीन टीमध्ये कमी कॅफिनसह कॅमेलिया सिनेन्सिसच्या पानांपासून ‘ग्रीन टी’ची चहा पावडर तयार होते. तर यात वेलची, तुळशी, लिंबू, आले, मध, पुदीना अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ग्रीन टी बनवून स्वाद घेऊ शकता. या ग्रीन टिचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?

२) आईस्ड ग्रीन टी

आईस्ड ग्रीन टी हा खास करून उन्हाळ्यात घेतला जातो. आईस्ड ग्रीन टी बनवायला देखील अगदी सोपा आहे. एका चहाच्या पातेल्यात उकळलेलं पाणी घ्या. त्यात ग्रीन टी-बॅग फक्त ५ मिनिटं ठेवा. जास्त वेळ ठेऊ नका कारण जास्त वेळ ठेवल्यास टी कडू लागू शकतो. त्यानंतर ग्रीन टी थंड झाल्यावर चहाच्या कपात बर्फाचे खडे टाका. त्यात लिंबाची खाप व दोन-तीन पाने पुदिना टाका. चवीसाठी साखर किंवा मध टाका. अशा रीतीने तुम्ही निरोगी राहण्यासाठी आईस्ड ग्रीन टीचा आस्वाद घ्या.

३) ब्लॅक टी

अमृततुल्य पेय म्हणून ओळखला जाणारा हा चहा शरीरात ताजेपणा आणि चैतन्य आणते. बरं हे सर्व तर सामान्य चहाबद्दल झालं मात्र, कठोर आहार पाळणारे लोकं सकाळी कोरी चहा अर्थातच ब्लॅक टी घेतात. दररोजच्या चहामधून दूध काढून टाकलं तर ब्लॅक टी तयार होतो. काळा चहा सामान्य चहाच्या तुलनेत आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. दररोज सकाळी काळा चहा पिल्याने शरीरसंबंधी अनेक समस्या दूर होऊ शकतात. ब्लॅक टी पिल्याने मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, किडनी स्टोन आणि इतर रोगांचा धोका कमी होतो.

४) हर्बल टी

हर्बल टीचे खूप प्रकार आहेत. हर्बल टी म्हणजे कॅमोमाइल, आले, पुदिना, गवती चहा यांचा वापर करून हर्बल टी बनवला जातो. ‘हर्बल टीने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच, ‘हर्बल टी’ आपल्या पचन तंत्रासाठीदेखील चांगला आहे. दररोज ‘हर्बल टी’चे नियमित सेवन केल्याने तुमचे वजनही कमी होते. याशिवाय ‘हर्बल टी’ सर्दी, पडसे, खोकला यांसारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण करते. बर्‍याच ठिकाणी लोकांकडून ‘हर्बल टी’चा वापर काही आजार बरे करण्यासाठी केला जातो.