Best Fruit Juice For Diabetes : ताज्या फळांचा ज्यूस पिणे फायदेशीर असते. पण, मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर कदाचित फळांचा ज्यूस पिणे तुमच्यासाठी धोकादायकसुद्धा ठरू शकते. फळांच्या ज्यूसमध्येही साखर असते, जी तुमचे शरीर लवकर शोषून घेते आणि जर काळजीपूर्वक व्यवस्थापित केले नाही तर रक्तातील साखरेत वाढ होऊ शकते. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तुम्ही कोणत्या ज्यूसचे सेवन करता, कशाप्रकारे करता आदी गोष्टींनी खूप फरक पडतो.
तर १२ वेगवेगळ्या संशोधनांचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले की, १०० टक्के फळांचा ज्यूस प्यायल्याने प्रौढांमध्ये फास्टिंग ब्लड शुगर, फास्टिंग इन्सुलिन किंवा HbA1c वर (HbA1c हा एक रक्त तपासणीचा प्रकार आहे. तो तुमच्या शरीरातील मागील २ ते ३ महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची पातळी दाखवतो) विशेष परिणाम करत नाही. तसेच दुसऱ्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, संपूर्ण फळे खाल्ल्याने टाइप २ डायबिटीसचा धोका कमी होतो; कारण या फळात फायबर असते, जे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. पण, ज्यूस काढल्यावर फायबर निघून जाते, त्यामुळे ज्यूसचा फळांसारखा फायदा शरीराला मिळत नाही.
तुमच्यासाठी कोणता रस चांगला आहे आणि का?
१. भाज्यांचा रस – भाज्यांपासून बनवलेल्या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि पोषक घटक जास्त असतात. उदाहरणार्थ पालक, काकडी आणि सफरचंद यांच्यापासून बनवलेल्या ???ज्यूसमध्ये मोठा ग्लास संत्र्याच्या ज्यूसपेक्षा रक्तातील साखरेवर प्रमाण सौम्य असते. ??? काही आहारतज्ज्ञ म्हणतात की, हा पदार्थ डायबिटीस असलेल्या लोकांसाठी सुरक्षित मानला जातो.
२. १०० टक्के फळांचा रस – काही संशोधनांनुसार अजिबात साखर नसणारा फळांचा रस थोड्या प्रमाणात घेतल्यास काहीच हरकत नाही. उदाहरणार्थ, २०१७ च्या मेटा-विश्लेषणात १०० टक्के फळांच्या रक्तातील साखरेवर वाईट परिणाम झाला नाही. ज्यूस एकट्याने पिण्यापेक्षा जेवणाबरोबर ज्यूस पिणे चांगले आहे आणि संपूर्ण दिवसाच्या कार्बोहायड्रेट-नियंत्रित आहाराचा भाग म्हणूनच तो घ्यावा.
३. गोड पदार्थ खाणे टाळा – ज्या ज्यूसमध्ये साखर जास्त घातलेली असते किंवा ज्यूस खूप जास्त प्रमाणात पितात, त्यामुळे ती रक्तातील साखर पटकन वाढवते; ज्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी याचे सेवन टाळणे चांगले.
मधुमेह असल्यास कोणत्या प्रमाणात रस प्यावा?
- जर तुम्ही १०० टक्के फळांच्या रसाचा समावेश करायचा ठरवला तर ते सुमारे १५० मिली (½-१ ग्लास) पर्यंत मर्यादित करा.
- जेवणासोबत रस प्या; यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण मध्यम होईल.
- कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे किंवा भाज्यांचा रस प्या. उदा – संत्र्याच्या तुलनेत गाजर, सफरचंद, पालक यांचे मिश्रण असणारा ज्यूस प्या.
- ज्यूसची बाटली विकत घेताना त्यात साखर नाही ना आणि ‘१०० टक्के ज्यूस’ असे लिहिलेले लेबल आहे का याची खात्री करा.
- रस प्यायल्यानंतर तुमचे शरीर कसे प्रतिक्रिया देते हे पाहण्यासाठी रक्तातील ग्लुकोजची तपासणी करा.
- ज्यूसऐवजी फळे, भाज्या खाणे जास्त फायदेशीर आहे, कारण त्यातील फायबर आणि चावून खाण्याची प्रक्रिया यामुळे साखर शरीरात हळूहळू शोषली जाते.
