How to remove Insects from cauliflower: अनेकांना फ्लॉवरची भाजी खायला खूप आवडते. परंतु, पावसाळ्यात फ्लॉवरमधील आळ्यांची समस्या आणखी वाढते. कोबीच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये लहान आळ्या असतात, जे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. जर कोबीतील आळ्या काढून टाकल्याशिवाय भाजी बनवली तर त्यामुळे अन्नातून विषबाधा पोटदुखी, उलटी, जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कधीकधी आळ्या इतक्या लहान असतात, ज्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही या आळ्या सहजपणे साफ करू शकता.

आळ्या दूर करण्यासाठी उपाय

गरम पाणी वापरा

फ्लॉवरमध्ये असलेल्या लहान आळ्या गरम पाण्याने सहज काढून टाकता येतात. यासाठी प्रथम फ्लॉवरचे लहान तुकडे करा. आता ते कोमट पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवा. तुम्ही त्यात थोडे मीठदेखील घालू शकता, यामुळे आळ्या आणि माती सहज निघून जाते.

व्हिनेगर आणि लिंबू वापरा

फ्लॉवर व्हिनेगर आणि लिंबूनेदेखील स्वच्छ करता येते. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला. आता या पाण्यात फ्लॉवरचे तुकडे काही वेळ ठेवा. यामुळे आळ्या आणि हानिकारक जीवाणू सहजपणे निघून जातात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीठ आणि हळद वापरा

मीठ आणि हळद हेसुद्धा आळ्या दूर करण्यास उपयुक्त आहेत. यासाठी पाण्यात मीठ आणि हळद मिसळा आणि त्यात फ्लॉवर घाला आणि १५ मिनिट तसेच ठेवा.

गरम पाण्यात उकळवा

फ्लॉवर चिरून गरम पाण्यात उकळवा, यामुळे जंतू आणि बॅक्टेरियादेखील नष्ट होतात. या पद्धतीने भाजीची चवही सुधारते.