कमळाच्या फुलांचे हे लटकन गणपतीच्या मखरासाठी पार्श्वभूमी म्हणून वापरा. ते कसे बनवता येईल हे पुढे वाचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयोगट – 15 वर्ष आणि पुढे

उत्पादन – फेविक्रिल अक्रेलिक रंग निऑन पिंक 018, फेविक्रिल अक्रेलिक कलर्स पर्ल मेटॅलिक गोल्ड 352, फेविक्रिल फॅब्रिक ग्लू, फाइन आर्ट ब्रशेस

साहित्य – माउंट बोर्ड, पांढरा कागद, पिवळा कार्बन कागद, पेन्सिल, रंगांची पॅलेट, पाण्याचे भांडे, पेपर कटर, कात्री, जाड सोनेरी धागा, प्लॅस्टिकचे मणी (गुलाबी, मेटॅलिक निळा)

पद्धत:

पायरी 1 – कमळाचे कटआउट्स बनवा.

  • गणेशोत्सवासाठी आपण कमळाच्या फुलांची सजावट बनवणार आहोत.
  • ए फोर आकाराचा पांढरा कगद घ्या व त्यावर कमळाच्या फुलाचे चित्र कट वर्क पेटल डिझाइनसह काढाय
  • कमळाचे फुल आउटलाइनवरून पेपर कटरच्या सहाय्याने कापून घ्या.
  • सजावटीसाठी 6 मोठी, 3 मध्यम आणि 3 लहान फुले बनवा.

पायरी 2 – आतील भाग कापून घ्या

  • कमळाच्या फुलाचा आतील भाग पेपर कटरने कापा.
  • चित्राचा संदर्भ घ्या

पायरी 3 – पार्श्वभूमी कापून व रंगवून घ्या.

  • माउंट बोर्ड घ्या.
  • तीन वेगवेगळ्या आकारांत कमळाची एकसारखी आउटलाइन बनवा.
  • अक्रेलिक रंग निऑन पिंक 018 ने कमळफुले रंगवा.
  • सुकण्यासाठी ठेवा.

पायरी 4 – फुलांची जुळणी

  • कमळ फुलांचे कटवर्क घेऊन ते अक्रेलिक रंग पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने रंगवा. सुकण्यासाठी ठेवाय
  • सर्व फुले एकाच रंगछटेत रंगवाय
  • मागील बाजूच्या कर्टवर्क फुलावर गुलाबी पिंक कट आउट्स फॅब्रिक ग्लुने चिकटवा.
  • सुकण्यासाठी ठेवा.

पायरी 5 – फुलांचे लटकन तयार करणे

  • जाड सोनेरी धागा, मेटॅलिक ब्लू प्लॅस्टिक बीड्स घेऊन मण्यांची माळ बनवा.
  • कमळ फुलांच्या दोन्ही टोकांना भोक पाडून त्यावर मण्यांची माळ जोडा.
  • पर्यावरणस्नेही कमळ फुलांची सजावट गणेशोत्सवासाठी तयार आहे.

(भावना मिश्रा, फेविक्रिल तज्ज्ञ)

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१९ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This ganesh chaturthi with colorful and eco friendly do it yourself recipes nck
First published on: 29-08-2019 at 10:30 IST