पावसाळ्याच्या सीजनमध्ये काही तरी गरम आणि चटपटीत खावस वाटत. अशा पदार्थांच्या यादीमध्ये नेहमीचे ठरलेले सामोसे, वडा, भजी असे पदार्थ असतातच. याच यादी मध्ये अजून काही हटके पदार्थ जोडायला हवेत. एखादी चवदार डिश पावसाळ्याच्या दिवशी आपला मूड छान करू शकते. मस्त  पाऊस कोसळत असतांना झालेल्या थंंड वातावरणात गरम गरम मोमोज खाण्याची मज्जाच वेगळी. पावसाळ्याच्या सीजनमधील अजून एक आवडता पदार्थ म्हणजे कॉर्न किंवा मकई. याच स्वीट कॉर्नसह ही मोमोजची रेसिपी बनवता येईल. शेफ संजीव कपूर यांनी कॉर्न चीज फ्राइड मोमोजची रेसिपी शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

३/४ कप उकडलेले स्वीट कॉर्न अर्थात गोड मकईचे दाने

१ कांदा

३ ते ४ -हिरव्या मिरच्या

कोथींबीर

चवीनुसार मीठ

१/२ कप शेडार चीज

१/२ कप मॉझरेला चीज

१/४ टीस्पून गडद सोया सॉस

१ टीस्पून तबस्को सॉस

१/२ टीस्पून लसूण पावडर

तयार  मैद्याचे पीठ

कृती

एका भांड्यात उकडलेले स्वीट कॉर्न, हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर, मीठ, शेडार चीज, मॉझरेला चीज, सोया सॉस, तबस्को सॉस आणि लसूण पावडर घाला. हे साहित्य चांगले मिक्स करा.

मैद्याचे पीठ घ्या आणि त्याचे पातळ ४-५ इंच छोटे गोल पुऱ्या करा.

एक एक पुरी घ्या आणि मध्यभागी तयार केलेलं सारण भरा.

सारण भरून बंद करण्यासाठी कडा एकत्र आणून त्याला मोमोचा आकार द्या.

कढईत तेल गरम करा आणि मोमोज व्यवस्थितपणे तळा.

आपल्या आवडीच्या सॉससह  गरम आणि ताजे ताजे सर्व्ह करा.

शेफची ही रेसिपी नक्की ट्राय करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This monsoon enjoy easy corn cheese fried momos at home ttg
First published on: 27-07-2021 at 09:11 IST