लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप TikTok ने एक नवीन विक्रम केलाय. TikTok डाउनलोड करणाऱ्यांची संख्या आता दोन बिलियन म्हणजे तब्बल 2 अब्जहून जास्त झाली आहे. ‘सेन्सर टॉवर’च्या रिपोर्टनुसार ‘बाइटडान्स’ची मालकी असलेल्या सोशल व्हिडिओ अ‍ॅप TikTok ला जगभरातील अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर दोन बिलियनपेक्षा अधिक वेळेस डाउनलोड करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच महिन्यांपूर्वी TikTok डाउनलोड करणाऱ्यांची संख्या 1.5 बिलियन होती. आता केवळ पाच महिन्यांमध्येच हे अ‍ॅप 50 कोटींहून अधिक जणांनी डाउनलोड केले. 2020 च्या पहिल्या तिमाहीत TikTok ने सर्वाधिक डाउनलोड झालेलं अ‍ॅप असा विक्रम केला आहे. 31 मार्चला संपलेल्या तिमाहीत हे अ‍ॅप 315 मिलियन युजर्सनी डाउनलोड केलं. तर, याच कालावधीत फेसबुकची मालकी असलेले लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोडच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या तिमाहीत जवळपास 250 मिलियन डाउनलोड व्हॉट्सअ‍ॅपला मिळाले. यासोबत, टिकटॉकने 2018 मधील चौथ्या तिमाहीत झालेल्या 205 मिलियन डाउनलोडचा स्वतःचा रेकॉर्डही मोडला.

विशेष म्हणजे एकूण डाउनलोडच्या तुलनेत TikTok ला एकट्या भारतातून 611 मिलियन डाउनलोड मिळालेत. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनमध्ये या अ‍ॅपला 196 मिलियन डाउनलोड मिळालेत. चीनमध्ये TikTok ला Douyin नावाने ओळखलं जातं. TikTok डाउनलोड करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत हे अ‍ॅप 165 मिलियन वेळेस डाउनलोड करण्यात आले आहे.

करोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. त्यामुळे लोकं घरच्या घरी मनोरंजनाचा पर्याय शोधत आहेत. TikTok चा वापर करणाऱ्यांच्या संख्येत इतक्या झपाट्याने वाढ होण्यामागे तेही कारण असू शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiktok 2 billion downloads india tops the chart with 611 million downloads sas
First published on: 30-04-2020 at 17:19 IST