Hair Tips : जाड आणि सुंदर केसांसाठी काय प्रयत्न केले जातात हे अनेक मुलींना माहित नाही. केस दाट करण्यासाठी बाहेरील उत्पादने वापरण्याबरोबरच आपले खाणं पिणं देखील महत्त्वाचं असतं. कारण पौष्टिक आहार घेतला नाही तर केसांची वाढ होत नाही. असं असलं तरी चुकीची जीवनशैली आणि प्रदूषणामुळे आपल्याला अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागतो. सर्वात मोठी समस्या ही आहे की कधी कधी कोणतेही कारण नसतानाही आपले केस स्वतःच पातळ आणि कमकुवत होतात. याचा अर्थ असा की तुमच्या केसांमध्ये कोंडा किंवा स्कॅल्प इन्फेक्शन नसले तरी तुमचे केस स्वतःच गळू शकतात आणि त्यांची मात्रा हळूहळू कमी होऊ शकते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Eating Chavalichi Bhaji Can Cure Thyroid
चवळीच्या भाजीने थायरॉईड बरा होतो का? वजन कमी करताना चवळी किती फायद्याची, तज्ज्ञांची स्पष्ट माहिती, वाचा

अशा परिस्थितीत केसांना घट्ट करण्यासाठी काही फळे आणि भाज्यांव्यतिरिक्त केसांसाठी काही औषधी वनस्पती देखील आहेत, ज्याचा वापर तुम्ही तुमचे केस दाट करण्यासाठी दररोज करू शकता. या औषधी वनस्पतींमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचे मानले जाते, जे शरीरातील पित्त दोष संतुलित करण्याव्यतिरिक्त, ब्लड सर्क्यूलेशन संतुलित करतं, ज्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया अशा औषधी वनस्पती.

आणखी वाचा : Skin Care Tips: रात्री झोपताना हे तेल चेहऱ्याला लावा, काही दिवसात चमक येईल

भृंगराज आणि ब्राह्मी वापरा, केस चमकतील
भृंगराज आणि ब्राह्मी द्वारे देखील तुम्ही तुमचे केस लांब आणि दाट करू शकता. या दोन्ही औषधी वनस्पती आहेत, ज्या केसांना घट्ट करण्यास मदत करतात. असं मानलं जातं की भृंगराजची पाने चघळल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस दाट होण्यास मदत होते, तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी एक चमचा घेऊ शकता.

आणखी वाचा : Health Tips : विवाहीत पुरुषांनी हे ५ पदार्थ खावेत, तुम्हाला मिळतील आश्चर्यकारक फायदे

कोरफडीचे अनेक फायदे
कोरफड बद्दल सर्वांना माहिती आहे. हे केस आणि त्वचेसाठी नेहमीच फायदेशीर मानले गेले आहे. कोरफड म्हणजे अॅलोवेरा जेल आपल्या केसांना पोषण देणार्‍या टाळूचा pH संतुलित ठेवतं. तुमचे केस मॉइश्चरायझ आणि हायड्रेट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासोबतच तुम्ही त्याचा रस पिऊ शकता.