First Trip With Partner : जेव्हा तुम्ही नवीन रिलेशनशीपमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा असतो. त्याच वेळी, पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी सर्वकाही करायचं असतं. बहुतेक लोक आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी ट्रिपचा प्लॅन आखतात. आपली पहिली ट्रिप अविस्मरणीय व्हावी, असं लोकांना वाटतं. या ट्रिपमध्ये सर्व काही परफेक्ट व्हावं असं वाटत असतं. पण कधी कधी छोट्या चुका ट्रिपची मजा खराब करतात. तुमच्याकडे तुमच्या पहिल्या ट्रिपच्या वाईट किंवा लाजिरवाण्या आठवणी राहतात. अशा स्थितीत तुमच्या पार्टनरसोबतची पहिली ट्रिप खराब होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्या ट्रिपदरम्यान जोडप्यांकडून अशा चुका होतात ज्यामुळे त्यांचा जोडीदार नाखूष होऊ शकतो. या चुका टाळण्यासाठी तुम्हाला काही रोमँटिक ट्रॅव्हल टिप्स देण्यात येत आहेत.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

फोटो क्लिक करण्यात व्यस्त होऊ नका
अनेकदा कुठेतरी गेल्यावर फोटो काढण्यात व्यस्त होतात. आठवणी टिपण्याच्या नादात आनंद घेता येत नाही. तुम्ही सेल्फी आणि फोटोग्राफीमध्ये इतके व्यस्त होतात की तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जोडीदारासोबत आठवणी बनवा. त्या आठवणींना कॅप्चर करण्याकडे लक्ष द्या.

आणखी वाचा : हिवाळ्यात रुम हीटर वापरणाऱ्यांनी काळजी घ्या, पश्चाताप होईल, जाणून घ्या काय आहे कारण ?

जोडीदाराच्या आवडी-निवडीची काळजी घ्या
ट्रिप दरम्यान तुम्ही प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले असेल, पण त्या नियोजनात जोडीदाराच्या आवडी निवडीचा समावेश केला पाहिजे. उदाहरणार्थ कुठे राहायचं, कुठे खायचं किंवा कोणते डीशेस मागवायचे…प्रवास किंवा खरेदी इत्यादींमध्ये जोडीदाराच्या आवडी-निवडीला महत्त्व द्या.

आणखी वाचा : Relationship Tips: जोडीदाराच्या या चार गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, नात्यात अंतर येऊ शकतं…

योग्य लोकेशनची निवड
अनेक वेळा तुम्ही प्रवासासाठी अशी जागा निवडता जी तुमच्या जोडीदाराला आवडत नाही. त्याला तिथे जायचे नाही किंवा दुसरीकडे कुठेतरी जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ट्रिपसाठी अशी जागा निवडा, जिथे दोघेही आनंद घेऊ शकतील.

आणखी वाचा : Marriage Tips: साखरपुडा झाल्यानंतर चुकूनही या चुका करू नका, नातं तुटू शकतं

नाराज होऊ नका
अनेकदा ट्रिपमध्ये असे काही घडते, ज्यामुळे तुमचा मूड खराब होतो. अशा परिस्थितीत लोक घाबरतात. काही लोक संपूर्ण प्रवासात नाराज आणि रागावलेले असतात, तर काहीजण ट्रिपवरून परत येण्याचे बेत आखतात. असे अजिबात करू नका. अस्वस्थ होण्यापेक्षा, ट्रिपचा आनंद घ्या आणि तुमच्या जोडीदाराला ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ द्या.