Tulsi Plant Growth Fast Hack: मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या तुळशीचे रोप आपल्या दारात, खिडकीत सुद्धा छान डेरेदार वाढावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकजण यासाठी छान कुंडी, माती, खत, पाणी सगळी सोय करतात. अधिकाधिक ऊन लागेल अशा ठिकाणी या तुळशीच्या कुंडीला जागा देण्यात येते पण एवढं सगळं करूनही अनेकदा रोप तगच धरत नाही आणि मग उगाच आपल्याच मनाला वाईट वाटू लागतं. पण आज आपण काही अशा टिप्स पाहणार आहोत ज्या वापरून तुम्हाला तुळशीचं रोप वाढवण्यासाठी नेमकं काय टाळायला हवं हे समजणार आहे. तसेच तुळशीच्या रोपाला बुरशी लागू नये म्हणून आपण काही सोप्या गार्डनिंग हॅक पाहणार आहोत. चला तर मग..

तुळशीच्या रोपाला पाणी व खत देताना ‘या’ चुका टाळा

सगळ्यात मोठी चूक म्हणजे कुंडी दिवसभर उन्हात ठेवणे, याने तुळशीची पाने सुकून जातात. खरं सांगायचं तर तुळशीच्या रोपाला सकाळचं ताजं कोवळं ऊन पुरेसं ठरतं, अगदी दुपारी १२- १ वाजता कडक उन्हात तुळशीची कुंडी कधीच ठेवू नये.

आता तुळशीला ऊन कमी लागतं म्हटल्यावर दुसरी चूक तुमच्या लक्षात आली असेल. भरपूर पाणी देणे हे आपल्याला जरी फायदेशीर वाटत असलं तरी त्याचा परिणाम उलटाच होत असतो. तुळशीच्या मुळाशी सतत पाणी ओतून चिखल करून ठेवल्याने मुळांना बुरशी लागू शकते. तुम्हाला नक्की कधी पाणी द्यायला हवे याचा सोपा निकष सांगायचा तर रोपाच्या आजूबाजूला एक चमचा थोडा फिरवून पाहा जर चमचा एक ते दोन सेमी खाली जात असेल आणि त्यात कोरडेपणा जाणवत असेल तरच तुम्हाला तुळशीला पाणी द्यायचं आहे.

बुरशी येणे टाळण्यासाठी काय कराल?

आता, वर म्हटल्याप्रमाणे महत्त्वाची टीप म्हणजे तुळशीला बुरशी लागू नये म्हणून काय करावं? तर यासाठी आपल्याला मसाल्याच्या डब्यातील दोन खडे मसाले कामी येऊ शकतात. आपल्याला काळी मिरी व लवंग वाटून त्याची बारीक पूड करायची आहे व ती तुळशीच्या मुळाशी टाकायची आहे. या दर्पामुळे किडे किंवा बुरशी रोपाला चिकटून राहत नाही. अगदी अतिरेक करू नका एका मध्यम आकाराच्या रोपासाठी तीन ते चार मिऱ्या व लवंग पुरतात. SP Gardening Marathi या युट्युब अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा टिप्सचा व्हिडीओ सुद्धा पाहू शकता.

हे ही वाचा << कोरा चहा केसासाठी ‘असा’ वापरल्याने भरभर वाढते लांबी व रंग होतो गडद; केस धुताना व नंतर काय करावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला वरील टीप कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच कोणत्या टिप्स आपल्याला वाचायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून विचारा आम्ही लवकरच आपल्यासाठी अशा आयडियाआज घेऊन येऊ.