मायक्रोब्लॉगिंग साईट अशी ओळख असणाऱ्या ट्विटरने एका मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विविध पक्ष व संस्थांसाठी काम करणाऱ्या आयटी सेलची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. ट्विटरने कॉपी पेस्ट होणारे ट्विट हाइड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे, जर तुम्ही कोणाचे ट्विट कॉपी करून ते पेस्ट करत असाल किंवा एकच ट्विट अनेकजण करत असतील, तर ते ट्विट लोकांच्या टाइमलाइनवरून हाइड केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरकडून या संदर्भात ट्विट करून सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. ट्विटरकडून सांगण्यात आले आहे की, मागील काही वर्षांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कॉपी-पेस्ट ‘copypasta’ वाल्या ट्वटिच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच ट्विटला अनेकजण कॉपी करून ट्विट करत आहेत. अशावेळी आम्ही अशा ट्विटची व्हिजिबिलीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter made a big decision msr
First published on: 29-08-2020 at 14:16 IST