scorecardresearch

Premium

आंघोळीच्या पाण्यात मिसळा फक्त ‘या’ दोन गोष्टी; दुर्गंधी तर दूर होईलच, पण तुमचा चेहराही उजळेल!

अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळून अंघोळ करू शकता. यामुळे त्वेचेच्या समस्या दूर होऊ शकतात.

Bathing Tips
आंघोळीच्या पाण्यात मिसळा 'या' गोष्टी (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नियमित आंघोळ करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. मग आपण दररोज आंघोळ करतो, तरीही शरिराचा दुर्गंध का येतो? त्यावर उपाय म्हणून, अनेकजन साबण किंवा सुगंधित परफ्यूमचा वापर करतात. हे सतत वापरत असल्याने अंडरआर्म्स काळपट होतात. खरतंर शरिरातून निघणाऱ्या घामाच्या दुर्गंधीवर सुगंधित परफ्यूम किंवा साबण हा कायमचा उपाय असू शकत नाही. जर आपल्याला या हेक्टीक पासून सुटका करून घ्यायची असेल तर ही माहिती तुमची अडचण नक्कीच दूर करेल, तेही कुठलाही खर्च न करता, अगदी नैसर्गिकपणे. आंघोळीच्या पाण्याबरोबर फक्त ‘या’ दोन गोष्टी मिसळून आंघोळ केल्याने तुम्हाला अधिक स्फूर्ति मिळेल आणि तुमचा दिवसही उत्तम बनेल. त्वचेच्याही समस्या दूर होतील. चला तर वाचा मग हा घरगुती जुगाड सविस्तरपणे…

तुमच्या शरीराला घामामुळे वास का येतो?

जेव्हा हवा उष्ण आणि दमट असते तेव्हा शरीराला जास्त घाम येतो, अर्थात आपल्या त्वचेतून बाहेर पडणारा घामाचा प्रत्येत थेंब आपल्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी मदत करत असतो. शरीर थंड ठेवण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. मात्र, यामुळे कधीकधी दुर्गंधीही येते. प्रत्येक माणसाला घाम येतो. मात्र, त्यांच्या शरीराचा वास वेगवेगळा असतो. काहींच्या शरीराला कमी वास येतो तर काही लोकांना जास्त वास येतो. यामुळे अनेकजण त्रस्त असतात. मग काय उपाय करता येईल, जाणून घ्या खालीलप्रमाणे…

आंघोळी पाण्यात ‘या’ गोष्टी मिसळा आणि दुर्गंध पळवा

अंघोळीच्या पाण्यात फ्रेशनेससोबतच त्वचेची काळजी घेण्यासाठी काही वस्तू मिसळल्यास त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतील. या वस्तू तुमच्या त्वचेची काळजी तर घेतीलच शिवाय, त्यांचा सुगंध तुम्हाला ताजंतवानं ठेवेल आणि आंघोळ केल्यावर तुम्हाला आणखी बरं वाटेल. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. पाण्यात या दोन गोष्टी मिसळल्याने तुमच्या समस्या दूर होतील.

(हे ही वाचा : दूध, दही, पनीरच नव्हे तर ‘या’ ५ गोष्टींतूनही मिळेल भरपूर कॅल्शियम, हाडांना बनवतील लोखंडासारखं टणक )

१. कडुलिंबाची पानं

कडुलिंब हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे जे घामातील बॅक्टेरिया नष्ट करण्यात आणि वास कमी करण्यास मदत करते. तुमच्या त्वचेवर अ‌ॅलर्जी, मुरुम, तारुण्य पिटिकांची समस्या असेल तर आंघोळीसाठी ८ ते १० कडुलिंबाच्या पानांचा वापर करणं फायदेशीर ठरेल. ही कडुनिंबाची पानं एक पेलाभर पाण्यात उकळून गाळून घ्या. हे पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मिसळा. या पाण्यानं आंघोळ केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.

२. लिंबू आणि बेकिंग सोडा

आंघोळीच्या पाण्यात लिंबू आणि बेकींग सोडा घाला. या पाण्याने आंघोळ करा. हे प्रथम शरिरातील सर्व जीवाणू नष्ट करते आणि त्यातून बाहेर पडणारा दुर्गंध काढण्यास मदत करते. त्याचबरोबर, ते आपल्या बगले आणि पायांमध्ये झालेले कोणत्याही प्रकारचे त्वचेचे संक्रमण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे पाण्यात लिंबाचा रस आणि बेकींग सोडा टाका आणि पाण्याने आंघोळ करा.

‘हे’ सुध्दा उपयुक्त

तुरटी आणि खडेमीठ किंवा सैंधव, ग्रीन टी, कपूर, निलगीरी तेल, गुलाब पाणी या नैसर्गिक द्रव्यांच्या पाण्यानं अंघोळ केल्यानं थकवा दूर होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं होतं. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते.

(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. यासंदर्भात अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two natural ingredients to add to your bath to benefit your skin and body lifestyle news pdb

First published on: 21-09-2023 at 19:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×