थोडे जास्तीचे श्रम झाले की काही जण लगेचच थकतात. मात्र दिर्घकाळ सक्रीय रहायचे असल्यास योगशास्त्रात काही विशिष्ट आसने आहेत. ही आसने नियमित केल्यास तुम्हाला लवकर दमायला होत नाही. हे दंड स्थितीतील आसन आहे. या आसनाची स्थिती महादेवाच्या तांडवनृत्यासारखी किंवा नटराजाच्या मूर्तीच्या आकृतीबंधासारखी असते. म्हणूनच याला ‘नटराजासन’ म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथम दंड स्थितीत उभे रहावे, मग दोन्ही हात शरीराजवळ ठेवावे, नजर समोर असावी, पहिल्यांदा डावा पाय गुडघ्यात दुमडून मागच्या बाजूस न्यावा, डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा किंवा चवडा पकडावा, दुसरा हात म्हणजे उजवा हात सरळ जमिनीला समांतर ठेवावा. नजर उजव्या हातांच्या बोटांकडे स्थिर करावी. अशा प्रकारे हे आसन दहा सेकंदापर्यंत सुरूवातीला टिकवता येते. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही पायांनी हे आसन करावे म्हणजे एकदा डावा पाय शरीराच्या मागील बाजूस नेऊन डाव्या हाताने घोटा पकडावा. डाव्या बाजूने आसन पूर्ण होताच उजव्या बाजूने करावे. असे चार-पाच वेळा रोज करण्यास हरकत नाही. आसनादरम्यान श्वसन संथ ठेवावे. या आसनाचा कालावधी सुरूवातीला आठ सेकंद मग पंधरा सेकंद करावा. नजर हाताच्या बोटांवर स्थिर केली की हे आसन टिकवण्यास जड जात नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usfule yogasan to be active always natrajasan
First published on: 19-09-2017 at 12:00 IST