अनेकदा अधिक मेहनत घेऊनही घरात धनलक्ष्मीचे वास्तव्य राहत नाही. असं म्हटलं जात की घरातील सुख-समृद्धी त्या वास्तुच्या वातावरणावर अवलंबून असते. घरातील मूळ गाभा हे त्या घराचे स्वयंपाकघर असते. तुमचे स्वयंपाक घर छान, नीटनेटकं असणं हे एका उत्तम गृहिणीचे लक्षण आहे असं म्हणतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात प्रसन्न वातावरण निर्माण करायचे असेल तर स्वयंपाक घर केवळ नीटनेटकं असून चालत नाही तर त्यात वास्तूशास्त्राची भूमिका महत्त्वाची असते. किचन सजवण्यासाठी आपण कितीतरी वस्तू वापरत असतो. पण किचन सजवण्याच्या नादात आपण अशा काही वस्तू सुद्धा वापरतो, की ज्यामुळे आपण स्वतःचं भविष्य खराब करतो. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वस्तू.

किचनची सजावट करताना वास्तू शास्त्रावर लक्ष ठेवणं अंत्यतं गरजेचं असतं. किचनमध्ये काम करता करता कधी कधी आपल्या हातून काही वस्तू फुटतात, तुटतात. काही वस्तूंसोबत आपल्या आठवणी जोडलेल्या असतात म्हणून त्या वर्षोनवर्षे त्या वस्तू आपण सांभाळून ठेवतो. पण काही वस्तू आणि भांडी अशा असतात ज्याने तुमच्या जीवनात चांगला वाईट प्रभाव पडत असतो. आज आपण अशा काही वस्तू आणि भांडी पाहणार आहोत, ज्या आपण कधीही आपल्या किचनमध्ये ठेवू नयेत.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

आचार्य इंदू प्रकाश यांनी या विषयावर आधारित काही टिप्स शेअर केल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली आणि फाटलेली भांडी घरात कधीही देऊ नयेत. अनेकजण घरात तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात ठेवतात. ही तुटलेली भांडी घरात वापरतातही. पण तुम्हाला माहिती आहे काय की तुटलेली आणि फुटलेली भांडी ही वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानली जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात वापरत असाल तर आजच ही सवय बदला. अन्यथा आपलं खूप नुकसान होऊ शकते. खंडीत आणि तडकलेली भांडी स्वयंपाकघरात का ठेवू नये. त्यामुळे कुठल्या वास्तू दोषांना सामोरे जावं लागू शकतं.

वास्तु शास्त्रानुसार, तुटलेल्या आणि फुटलेल्या भांड्यात जेवण केल्यास घरातील समस्या वाढतात. घरात भांडण होतात. तुटलेल्या भांड्यात जेवण केल्याने आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आरोग्याशी संबंधित आजार वाढत जातात. तुटलेली आणि फुटलेली स्वयंपाकघरात भांडी वापरल्याने कुटुंबाच्या आनंद आणि शांततेवर परिणाम होतो. तसेच, कर्जही वाढत जाते. जरी अशी तुटलेली आणि फुटलेली भांडी स्वयंपाकघरात पडलेली असतील तर ती वास्तुनुसार अशुभ मानतात. अशी भांडी घरात ठेवल्याने घरात विवाद होतात. तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात ठेवल्याने नकारात्मकता वाढवते. यामुळे घराची आर्थिक स्थिती खराब होते.

कर्ज आणि इतर प्रकारचे त्रास टाळण्यासाठी अष्टकोनी म्हणजे आठ-कोनाचा आरसा उत्तर दिशेला ठेवावा. असा आरसा घरात लावल्याने अनेक शुभ परिणाम मिळतात. म्हणून निश्चितपणे अष्टकोनी आरसा लावा. हा आरसा बसवल्याने वास्तूतले दोष नाहीसे होतात. तसंच वास्तूत प्रवेश करू पाहणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच थोपवून परावर्तित केली जाते.

फुटलेला आरसा कधीही घरात ठेवू नये. यामुळे नकारात्मक उर्जा घरात सक्रिय होते.

अशा वस्तू घरात ठेवल्यास घरात भांडणं होतात. घरातील व्यक्ती आजारी पडण्याबरोबरच घरात आर्थिक तंगी भासू लागते.