व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फ्लिपकार्ट या भारतील मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने ‘फ्लिपहार्ट डेझ’ नावाने एक विशेष ऑनलाइन स्टोअर सादर केले आहे. यामध्ये विविध ब्रँड सादर करण्यात आले असून ग्राहकांना खरेदीची उत्तम संधी मिळणार आहे. यात किफायतशीर आणि आकर्षक अशी खेळणी, सौंदर्यप्रसाधने आणि घरगुती सजावटीसाठीच्या वस्तू असे पाच हजारांहून अधिक ब्रँड्स उपलब्ध आहेत. ग्राहकांना अविस्मरणीय खरेदीचा आनंद देण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर्सही कंपनीने यानिमित्ताने उपलब्ध करून दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत सांगताना फ्लिपकार्टचे वरिष्ठ संचालक निशित गर्ग म्हणाले, व्हॅलेंटाइन हा केवळ प्रेमी युगुल किंवा पती-पत्नी यांच्यापुरताच मर्यादित न -राहता भाऊ-बहिण, आजी-आजोबा किंवा मित्र-मंडळींसोबत साजरा करता येतो. फ्लिपहार्ट डेज स्टोअरद्वारे, ग्राहकांना खातरजमा केलेल्या स्टोअरवरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच यामध्ये एकहून अधिक पर्याय उपलब्ध असल्याने खरेदी करणे आनंददायी होईल. तसेच यातील आणखी एक आनंदाची बाब म्हणजे भाग्यशाली विजेत्याला सिद्धार्थ मल्होत्राला भेटण्यासाठी संधी मिळणार आहे. ग्राहक माय ग्लॅम एक्स सिद्धार्थ मल्होत्रा लिट कलेक्शनमधून खरेदी करेल तेव्हा ही संधी मिळणार आहे.

यामध्ये लिपस्टिक, नेल पॉलिश आणि इतर डोळ्यांच्या उत्पादनांचा समावेश आहे. नव्या उत्पादनांमध्ये निव्हिया आणि मेबिलीनसह अनेक ब्रँडसचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे. व्हॅलेंटाइनच्या थीमवर आधारित खास चॉकलेटस, ज्यात कॅडबरी, हर्शीज, नेस्ले, लिंड्ट अशा अनेक नामवंत ब्रँड्सचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना ग्रीन व्हॅलेंटाइन डे साजरा करायची संधी मिळणार असून इनडोअर आणि आऊटडोअर अशा शोभिवंत झाडांचाही या कलेक्शनमध्ये समावेश असेल. ‘प्रेमाचा पंधवरडा’ या विशेष योजनेअंतर्गत रोज एका भाग्यवंताला मेबिलीनकडून विशेष हँपर मिळणार आहे. तसेच व्हॅलेंटाइन स्पेशल पुस्तकेही उपलब्ध या उपक्रमात उपलब्ध असतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day special flipkart exciting offer buy things and get chance to meet siddharth malhotra
First published on: 14-02-2019 at 16:43 IST