प्रेम करणा-यांसाठी आजचा दिवस खूपच स्पेशल आहे नाही का? प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. गुलाबाचे लाल फुल देत आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी किंवा तिच्यावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस स्पेशल असतो. म्हणूनच प्रेमी जोडपे या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पूर्वी चिठ्ठीवर आपल्या मनातली गोष्ट लिहून दिली जायची पण आता हळूहळू जग बदलंय व्हॉट्स अॅप, फेसबुकच्या जगात आज जो तो एका मेजेसवरून आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतोय. पण प्रेमाचे मेसेज फक्त गर्ल फ्रेंड किंवा बॉय फ्रेंडसाठी असतात असं नाही. आयुष्यभर साथ देईल असं वचन देणा-या पत्नीलाही तुम्ही मेसेज करू शकता. म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलोय काही निवडक मेसेजेसचे संकलन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* इंद्रधनुचे रंग पसरले आज सभोवताली
जसे फुलावे रंग उषेचे आज तुझ्या गाली
कठोर हृदया फुटतो पाझर नेत्रकटाक्षाने
जसाच यावा आठवणींचा कढ निशाकाळी
Happy Valentine’s day!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day 2017 messages for wife gifts quotes
First published on: 14-02-2017 at 12:12 IST