खरंतर कांदा ही काही हरयानाची मक्तेदारी नाही; पण तेथील भवानीखेडा भागातील अलखपुरा येथे राहणाऱ्या बलवंत सिंग उर्फ बाळू या शेतकऱ्याने ‘बलवान प्याज’ नावाची कांद्याची नवी प्रजाती शोधून काढली आहे.कांद्याचा कंद किती मोठा आहे, त्याची साल किती घट्ट आहे, रंग किती गडद लाल आहे याच्या आधारे चौधरी चरणसिंग हरयाणा कृषी विद्यापीठातून त्यांनी कांद्याच्या अनेक प्रजाती व त्यांची बियाणे गोळा केली होती. १९८४ पासून गेली दहा वष्रे प्रयत्न केल्यानंतर त्यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या मदतीने ‘बलवान प्याज’ नावाची कांद्याची नवी प्रजात तयार केली. त्याचे हेक्टरी उत्पादन ३५० क्विंटल आहे जे पारंपरिक कांद्यात केवळ २००-२५० क्विंटल आहे. त्याची साल जाड असल्याने कांद्याची ही प्रजात टिकायलाही चांगली आहे. या कांद्याचा कंदाचा भाग मोठा असतो, हा कांदा मध्यम तिखट असल्याने सर्वाना चालू शकतो व त्याची अंकुरण क्षमता जास्त आहे. रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामात येणारा हा कांदा १३५ ते १४०  दिवसात तयार होतो. त्याची उंची ३५-४० सें.मी आहे. त्याला १ ते १८ पाने असतात, ज्याला आपण कांद्याची पात म्हणतो. कांद्याच्या कंदाचे वजन ५० ते ६० ग्रॅम आहे. अर्थात नाशिकच्या लाल कांद्याचे वजन ५८ ते् ६२ ग्रॅम असून तो ९० ते १०५  दिवसात तयार होतो. बलवान प्याज ५०-६० दिवसांत लागवडीस तयार  होतो. हरयाणात हिस्सार येथे बलवंत सिंग यांनी हा बलवान प्याज तयार केला आहे. त्याचा रंग गडद लाल असतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे कांद्याच्या बियाण्याचा दर २ ते २.५० रू किलो आहे. जराशा वालुकामय चिकण मातीत (सँडी लोम) व चिकण जमिनीत हा कांदा येतो. त्याचे हेक्टरी उत्पादन ३००-३५० क्विंटल आहे. नाशिकच्या कांद्याचे हे उत्पादन २०० ते २५०  क्विंटल आहे. एका एकरात अडीच लाख रोपे येतात, त्याला पोल्ट्री खत व व्हर्मी कंपोस्ट खत वापरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकांदाOnion
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varieties of onions called balwan onion ready
First published on: 26-04-2014 at 01:58 IST