Zhanna D Art Death : विगन रॉ फूड इन्फ्लुएन्सर झान्ना सॅमोसोनोवा या विगन इन्फ्लुएन्सरचा वयाच्या ३९ व्या वर्षी मृत्यू झाला. तिला झान्ना डी आर्ट या नावाने ओळखलं जात होतं. झान्ना ही प्रसिद्ध व्हेगन रॉ फूड इन्फ्लुएन्सर होती. मागच्या काही वर्षांपासून ती कच्चा आहार घेत होती. न्यूयॉर्क पोस्टने या विषयी हे वृत्त दिलं आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार विगन रॉ फूड इन्फ्लुएन्सर झान्ना सॅमसोनोवा नावाच्या ३९ वर्षीय शाकाहरी प्रभावशाली व्यक्तीचा कच्च्या शाकाहारी आहारावर अनेक वर्षे उपासमारीमुळे मृत्यू झाला. झान्ना ही एक रशियन नागरिक आहे. तिच्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार झान्ना डी आर्ट चा २१ जुलैला मृत्यू झाल्याचं कळतं आहे.

झान्नाच्या एका पोस्ट नुसार ती मागच्या दहा वर्षांपासून पूर्णपणे विगन आणि कच्चा आहार घेत होती. तिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत झान्ना खूप थकलेली दिसत होती आणि तिला नीट चालताही येत नव्हतं. त्यानंतर तिला उपचारांसाठी घरी पाठवलं. पण तिने उपचार घेतले नाहीत. त्यानंतर मी तिला जेव्हा फुकेतमध्ये पाहिलं तेव्हा तिची प्रकृती पाहून भीती वाटली. तिच्या मैत्रिणीने हेदेखील सांगितलं की झान्ना माझ्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहते. मला रोज सकाळी भीती वाटत होती की तिचा मृतदेह तिच्या घरात सापडेल. मी तिला उपचारांचा सल्ला दिला होता पण तिने माझं ऐकलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झान्नाच्या आईने हे सांगितलं की झान्नाचा मृत्यू कॉलरा सारख्या संसर्गाने झाला. मात्र अद्याप तिच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. मात्र तिच्या आईने हे देखील सांगितलं की थकवा आणि सगळ्या शाकाहारी कच्च्या आहारामुळे तिच्या शरीरावर ताण आला होता आणि यातच तिचा मृत्यू झाला असा मला विश्वास आहे.