Use Hing For Flowers Plants, Marathi Garden Tips: अति तिथे माती ही म्हण आपण वर्षानुवर्षे ऐकत आहोत पण तुम्हाला माहितेय का खरोखरच जर अति केलं ना तरी मातीसुद्धा निकामी होऊ शकते. आज अचानक हे ज्ञान देण्याचे निमित्त म्हणजे आता हळूहळू उकाडा वाढत आहे. तुमच्या बाल्कनीत किंवा खिडकीत छोट्याश्या कुंडीत लावलेल्या रोपांची अधिक काळजी घेण्याची आता वेळ झाली आहे. आपल्याकडे खरंतर एक प्रेमळ पण चुकीचा समज असा असतो की जितकं जास्त खाऊ घालाल तितकी सुदृढथा वाढते. काही जण रोपांच्या बाबत सुद्धा हाच नियम लागू करतात. खतच नाही तर अनेकदा रोपांमध्ये भरपूर पाणी घातलं जातं, बरं का मंडळी असं केल्याने सततचा ओलावा हा बुरशीच्या वाढीला कारणीभूत ठरू शकतो. रोपांच्या मुळाशी बुरशी लागल्यास कीटक- किडे सुद्धा वाढू शकतात आणि मग हीच न बोलावलेली पाहुणी मंडळी रोपांच्या वाट्याचं पोषण सुद्धा फस्त करून टाकतात. आज आपण ही बुरशी लागू नये यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत. यासाठी आपल्याला किचनमधील हिंगाची डबी कामी येणार आहे.

SP गार्डनिंग मराठी या युट्यूब चॅनेलवर हिंगाचा वापर करून रोपांसाठी आवश्यक खत पाणी कसे तयार करता येईल अशी माहिती दिलेली आहे. आधी ही पद्धत पाहूया व मग काही महत्त्वाचे नियम सुद्धा जाणून घेऊया..

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

हिंगाचा वापर रोपांसाठी कसा कराल?

  • १ लिटर पाण्यासाठी एक चिमूटभर हिंग पुरेसे आहे.
  • साधारण १ ते दीड तास हे पाणी तसेच ठेवावे.
  • हिंगाचे सत्व पाण्यात उतरल्यावर पाण्याचा रंग हलका पिवळा होईल.
  • आपल्याला सर्वप्रकारच्या रोपांवर स्प्रे बॉटलने या पाण्याची फवारणी करता येऊ शकते.
  • स्प्रे करून झाल्यावर आपण प्रत्येक रोपाला लहान आकाराचा एक ग्लासभर असे हे पाणी घालू शकता.

जर आपण कोरड्या हिंगाचा वापर करणार असाल तर आधी माती नीट उकरून रोपांच्या जवळ चिमूटभर हिंग घालू शकता. हिंग एकाच ठिकाणी टाकून ठेवू नका, नीट पसरवून रोपांना सर्व बाजूंनी हिंग लागेल असे पाहा.

हिंगाचा वापर करताना काय लक्षात ठेवावे?

हिंग हे प्रमाणातच वापरा, अतिरेक वाईटच हे लक्षात ठेवा. हिंगाचे पाणी घालताना माती कोरडी असेल आणि पाणी घालण्याआधी तुम्ही माती थोडी हलवून वर खाली केलेली असेल याची खात्री करा. खरंतर दर १५ दिवसांनी माती थोडी हलवत राहणे रोपांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

हे ही वाचा<< Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा

एक महत्त्वाची बाब म्हणजे हा उपाय करताना वेळ सकाळ किंवा संध्याकाळचीच निवडा, जेणेकरून तुम्हाला कडक उन्हात हे पाणी लगेच सुकून जाणार नाही व नीट रोपांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचेल. तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे कमेंट करून कळवा.