टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांना झटका दिला असून ‘डबल डेटा’ ऑफरमधील दोन प्लॅन बंद केले आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटाऐवजी 3 जीबी डेटा मिळत होता. हे दोन प्लॅन बंद केले असले तरी डबल डेटा देणारे तीन प्लॅन अद्यापही कंपनीने सुरू ठेवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्होडाफोन’कडे डबल डेटा ऑफरअंतर्गत 299 रुपये, 399 रुपये, 449 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपयांचे प्लॅन आहेत. यातील 399 रुपये आणि 599 रुपयांचे दोन प्लॅन कंपनीने बंद केलेत. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा म्हणजे डबल डेटा ऑफरनुसार दररोज 3GB डेटा मिळायचा. 56 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100SMS, व्होडाफोन प्ले आणि Zee5 चं मोफत सबस्क्रिप्शन मिळत होतं. 599 रुपयांच्या प्लॅनमध्येही 399 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सुविधा होत्या. फक्त या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवस होती. आता हे दोन्ही प्लॅन कंपनीने बंद केले आहेत. याशिवाय कंपनीने यापूर्वीच 249 रुपयांचा प्लॅनही बंद केला आहे.

या प्लॅन्समध्ये मिळेल डबल डेटा :-
दोन प्लॅन बंद केले असले तरी व्होडाफोनकडे डबल डेटा ऑफर देणारे तीन प्लॅन अद्यापही आहेत. कंपनीच्या 299 रुपये, 449 रुपये आणि 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दुप्पट डेटा मिळेल. या तिन्ही प्लॅनमध्ये दररोज एकूण 4 जीबी (2 + 2 = 4GB/Day) डेटा वापरण्यास मिळतो. अनुक्रमे 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवस इतकी या तिन्ही प्लॅन्सची वैधता आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea double data offer for rs 399 rs 599 prepaid recharge plans discontinued sas
First published on: 20-05-2020 at 16:28 IST