इंस्टाग्राम, युट्युब, फेसबूक हे कोणतेही सोशल मीडिया ॲप उघडले की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त खाद्यपदार्थांचे व्हिडीओ दिसतात. रोज एकापेक्षा एक खाद्यपदार्थांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फुड व्लॉगर रोज नवनवीन खाद्यपदार्थांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. तुम्हालाही स्वयंपाकाची आवडत आहे का? नवनवीन खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असेल तर तुम्हीही फुड व्लॉगर होऊ शकता. फुड व्लॉगर होण्यासाठी तुम्हाला युट्युबवर तुमचे चॅनल सुरु करावे लागेल. तुम्हाला फक्त एक मोबाईल फोनची आवश्यकता आहे. येथे तुम्हाला Cooking व्हिडीओ  शूट  कसे करावे याची माहिती दिली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हिडीओ  शूट  करू शकता.

Cooking व्हिडीओ कसा  शूट करावा?

 • कोणताही व्हिडीओ अंधरामध्ये किंवा कमी प्रकाशात शूट  केला तर चांगले दिसत नाही. पाककृतीचे किंवा कोणताही व्हिडीओ शूट करताना भरपूर लाईट आवश्यक आहे. खोलीमध्ये किती प्रकाश आहे ते बघा. जिथे शूट करायचे आहे तिथे चांगला प्रकाश राहील याची खात्री करा. नसेल तर तिथे चांगल्या प्रकाशाचे ट्युबलाईट लावून घ्या. त्यानंतर कोणताही व्हिडीओ शूट करा जेणेकरून तुमचा व्हिडीओ चांगला शूट होईल.
 • व्हिडीओ शूट करण्यासाठी तुमच्याकडे चांगला कॅमरा आणि जास्त मेमरी असेल असा फोन आवश्यक आहे. सहसा असे मोबाईल फोन आजकाल प्रत्येकाकडे असतात. मोबाईल व्यवस्थित चार्ज करून घ्या.
 • सुरुवातीला तुम्ही कोणाच्यातरी मदतीने तुम्ही व्हिडीओ शूट करू शकता. पण जर तुम्ही स्वत: च सर्व व्हिडीओ  शूट करणार असाल तर तुमच्याकडे छोटासा ट्रायपॉड असणे आवश्यक आहे.
 • तुम्ही व्हिडीओ शूट करताना माहिती सांगणार असाल तर तुम्हाला एक चांगला माईक देखील आवश्यक आहे. माईकची पीन तुमच्या मोबाईला जोडा आणि माईक तुमच्या ड्रेसला जोडा जेणेकरून तुमचा आवाज नीट रेकॉर्ड होईल. त्यामुळे तुमचा व्हिडीओ चांगला  शूट  होईल.
 • पाककृतीची रेसिपी शूट करताना तुम्हाला पूर्वतयारी आधी करावी लागते. तुम्ही कोणती खाद्यपदार्थ तयार करणार आहात ते ठरवा. त्यासाठी आवश्यक सर्व भाज्या-साहित्य आणून ठेवा लागेल. व्हिडीओ शूट  करण्यापूर्वी तुम्ही सर्व साहित्य काढून व्यवस्थित ओट्यावर मांडून घ्या. ओटा स्वच्छ आणि मोकळा दिसेल याची खात्री करा.
 • मोबाईल फोन ट्रायपॉडला लावून घ्या. त्याला माईकची पीन जोडली आहे का याची खात्री करा. तुम्ही ट्रायपॉडची उंची आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करू शकता.
 • व्हिडीओच्या सुरुवातीला तुमच्या चॅनेलचे आणि तुमचे नाव सांगा. कोणता खाद्यपदार्थ तयार करणार आहात याची माहिती द्या. त्यानंतर तुम्ही पाककृतीसाठी काय साहित्य लागणार आहे ते  शूट  करून घ्या. साहित्याबद्दल माहिती सांगत राहा.
 • जर भाज्या चिरणार असाल तर चॉपिंग बोर्डच्या बाजूला ट्रायपॉड उभा करा आणि भाज्या चिरतानाचे व्हिडीओ रेकार्ड करून घ्या.
 • पोळी किंवा कणीक मळणार असाल तर त्याप्रमाणे ट्रायपॉडची उंची सेट करून घ्या आणि मग व्हिडीओ रेकार्ड करा.
 • व्हिडीओ रेकार्ड करताना तुम्ही छोटे छोटे व्हिडीओ रेकार्ड करून नंतर एडीट करताना जोडू शकता. किंवा व्हिडीओमध्ये Pause हा पर्याय असतो तो वापरून तुम्ही सलग व्हिडीओ रेकार्ड ट करू शकता. संपूर्ण व्हिडीओ रेकार्ड करण्याची आवश्यकता नाही. छोटे-छोटे क्लिप रेकार्ड करा. जेणेकरून फोनची मेमेरी वापरली जाणार नाही आणि कृती व्यवस्थित लक्षात येईल.
 • गॅसवर अन्न शिजवताना फोनवर वाफ येऊ शकते त्यामुळे कॅमेरा थोडा उंचीवर ठेवा. फोन गरम होणार नाही याची खात्री करा. तुमच्या कढई किंवा कुकरमध्ये अन्न शिजताना दिसेल अशा उंचीवर ट्रायपॉडवर मोबाईल सेट करून घ्या. व्हिडीओ रेकार्ड करणे सुरु करा आणि आता पुढील पाककृती सुरु करा. तुम्ही जे काही करत आहात ते कॅमेऱ्यात दिसेल याची खात्री करा. खाद्यपदार्थाची कृती सांगत हळू हळू पुढे जा. महत्त्वाच्या टिप्स सांगा.
 • आता पाककृती तयार झाल्यानंतर महत्त्वाचा भाग असतो तो सर्व्हिंगचा. तुम्ही जो काही खाद्यपदार्थ तयार केला आहे तो एखाद्या भांड्यात किंवा ताटात काढून छान सजवा. यासाठी देखील सर्व तयारी करुन घ्या त्यानंतर टॉयपॉडवर मोबाईल सेट करा आणि मग ताट वाढतानाचा व्हिडीओ रेकार्ड करून घ्या.

हेही वाचा – Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
mahesh manjrekar reacts on trolling
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
MDH Everest Masala Controversy Modi Sarkar Spice Board Big Decision
MDH, Everest मसाल्यांवर विदेशात बंदी घातल्यावर भारत सरकारचा मोठा निर्णय; मसाला मंडळाने काय सांगितलं?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

हेही वाचा – Jugaad Video: पोळीच्या पिठात साबण किसून टाका; स्वयंपाकघरातील ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका

व्हिडीओ रेकार्ड करताना या गोष्टी लक्षात ठेवा?

 • तुमचे स्वयंपाक घर लहान असेल तर तुमचा चेहरा न दाखवता तुम्ही फक्त पाककृती रेकार्ड करू शकता.
 • तुम्हाला कॅमेरासमोर बोलण्याचा आत्मविश्वास असेल तर तुम्ही कॅमेऱ्यासमोर उभे राहून कमेऱ्यासमोर उभे राहून संवाद साधू शकता.
 • तुम्ही व्हिडीओ एडीटर अॅप वापरून हे व्हिडीओ जोडून संपूर्ण व्हिडीओ बनवू शकता. व्हिडीओ कसा एडीट करावा याचे व्हिडीओ पाहून तुम्ही ते सहज तयार करून शकता.
 • तुम्हाला सातत्याने नवनवीन व्हिडीओ बनवून पोस्ट करावे लागतील. त्यातून मिळणाऱ्या अनुभवातून तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. हळू हळू तुमच्या चॅनेलचे फॉलोअर्स वाढतील.