Symptoms Of Trauma :आपण अनेकदा मानतो की ‘ट्रॉमा’ म्हणजे फक्त मनावर झालेला धक्का. पण तज्ज्ञ सांगतात की शरीर सुद्धा हा आघात आपल्या पेशींमध्ये साठवून ठेवतं. एखादा अपघात, नातं तुटणं, मोठं नुकसान किंवा मनावर खूप परिणाम झालेली दुखापत—या सर्वांचा परिणाम फक्त भावनांवर नाही तर शरीरावरही उमटतो. म्हणूनच अनेकदा कोणतीही शारीरिक कारणं नसतानाही थकवा, जडपणा, छातीत धडधड, कंबर-पाठदुखी किंवा अस्वस्थता जाणवते.
गेटवे ऑफ हीलिंगच्या एमडी (एएम) आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चांदनी तुगनैत सांगतात की, ट्रॉमा म्हणजे मोठा मानसिक किंवा शारीरिक आघात. याची लक्षणं वेळेत ओळखलं नाही तर गंभीर आजारांचं रूप घेऊ शकतं. अनेकांना तर हेही कळत नाही की ते ट्रॉमा अनुभवत आहेत. पण शरीर मात्र त्याचे सिग्नल देतंच राहतं.
शरीर कसा जपून ठेवतं ट्रॉमा?
डॉ. चांदनींच्या मते, मन आणि शरीर यांचा संबंध अतिशय सूक्ष्म आहे. भीती, धक्का किंवा ताण येताच शरीराचं नर्व्हस सिस्टिम ‘फाइट ऑर फ्लाइट’ मोडमध्ये जातं. त्या वेळी व्यक्त न झालेल्या भावना शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात अडकतात—छातीतील जडपणा, मान-खांद्यामध्ये ताण अशा रूपात.
ट्रॉमा शरीरात दिसतोय? हे संकेत ओळखा
- कोणतीही ठोस कारणं नसतानाही जबरदस्त थकवा
- सततची डोकेदुखी, मान-खांद्यातील कडकपणा
- पाठदुखी किंवा पोटदुखी
- झोप न येणे किंवा मध्येच दचकून जाग येणे
- भावना बोथट होणे, कोणतीही प्रतिक्रिया न मिळणे
- जुन्या घटना मनात चित्रपटासारख्या पुन्हा-पुन्हा समोर येणे
- भीती, छातीतील धडधड वाढणे
- अनेकांमध्ये ही स्थिती PTSD (Post-Traumatic Stress Disorder) म्हणून पाहिली जाते.
ट्रॉमातून बाहेर कसे पडाल? तज्ज्ञ सांगतात उपाय
१. ट्रॉमातून बाहेर पडण्याची पहिली पायरी – स्वीकार करणे
ट्रॉमाला दाबून ठेवण्याऐवजी त्याला जाणवू द्या. शरीरात कुठे ताण आहे, कुठे अस्वस्थता आहे—ती शांतपणे स्वीकारा. हळूहळू श्वासोच्छवासाच्या मदतीने शरीराला रिलॅक्स करा.
ध्यान, योग आणि ‘बॉडी अवेयरनेस’ प्रॅक्टिसेस यात खूप मदत करतात.
२. स्पर्श आणि हालचाल करा
हलक्या स्ट्रेचेस, सौम्य डान्स, संथ हालचाली—यामुळे शरीरात अडकलेली भावनिक ऊर्जा मोकळी होते.
सॉमैटिक थेरपी किंवा बॉडी-हिलिंग सेशन्सही अनेकांना प्रभावी वाटतात.
३. स्वतःशी दयाळूपणे वागा
हीलिंग हा एका दिवसाचा प्रवास नाही. शरीराचे संकेत ऐकायला शिकलात की ट्रॉमाची पकड हळूहळू सैल होते. स्वतःला वेळ देणं, धीराने पुढे जाणं—हेच सर्वात महत्त्वाचं.
ट्रॉमा म्हणजे केवळ आठवण नाही…तो एक असा अनुभव आहे जो आपल्या शरीरात खोलवर रुजतो. पण शरीरात वेदना साठवण्याइतकीच ती सोडून देण्याची शक्तीही असते. फक्त त्या शक्तीशी पुन्हा जोडण्याची गरज असते. शरीराचे सिग्नल समजून घेतले, त्यांचा स्वीकार केला—की खरी हीलिंग सुरु होते.
