What Happens If You Keep Kneaded Dough In Fridge: सकाळच्या वेळेस शाळा, ऑफिसला जाण्याची घाई या सगळ्यामध्ये पीठ मळण्याचा वेळ वाचवला जातो. वेळ वाचवण्यासाठी किंवा सोयीस्कर व्हावे यासाठी सकाळच्या वापरासाठी रात्री पीठ मळले जाते आणि फ्रीजमध्ये ठेवले जाते. अनेकदा सकाळी पीठ मळून संध्याकाळी खाल्ले जाते, रोटी आणि पराठे आदल्या दिवशी मळलेल्या पीठाचे करून खाल्ले जातात. फ्रीजमध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता मात्र ते जास्त वेळ ठेवणे आणि नंतर ते खाणे खूप हानिकारक आहे. मळलेले पीठ फ्रीजमध्ये किती काळ चांगले राहते आणि ते कधी खाऊ नये याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ…
पोषक घटक
बहुतेकदा इतर कोणत्याही पीठापेक्षा चपात्यांचे पीठ मळून ठेवले जाते. गव्हाच्या पीठामध्ये प्रथिने, स्टार्च, फायबर, व्हिटॅमन बी, फॉलिक अॅसिड, नियासिन आणि रिबोफ्लेविन, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि मँगनीज असते. पीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि भारतात प्रत्येक घरात चपाती, पराठे आणि पुरी बनवण्यासाठी ते वापरले जाते. तरीही जर तुम्ही मळलेले पीठ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवले तर ते खाण्यायोग्य नाही. त्या पीठातून तुम्हाला कुठलीही पौष्टिक मूल्य मिळणार नाहीत.
पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यास नेमके काय होते?
पीठ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने आणि नंतर ते खाल्ल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. पीठ मळून ठेवल्यावर जास्त वेळ झाला असेल तर त्यात रसायने तयार होऊ लागतात आणि ती आरोग्यासाठी हानिकारक असतात. पीठात अनेक हानिकारक जीवाणू देखील वाढू शकतात.
बराच काळ साठवून ठेवलेले पीठ खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. पीठात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात आणि ते आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवल्याने मायकोटॉक्सिन तयार होतात आणि त्यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होते. फ्रीजमध्ये साठवलेले पीठ फक्त खाण्यायोग्य असते. त्यामध्ये कोणतेही आरोग्यदायी फायदे नसतात. फ्रीजमध्ये मळून ठेवल्यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट झालेले असतात.
वेळेअभावी पीठ मळून ठेवावे लागत असेल तर काय काळजी घ्यावी?
जर तुम्ही सकाळी फ्रीजमध्ये पीठ साठवत असाल तर ते तयार करा आणि संध्याकाळी खा. किंवा जर तुम्ही रात्रभर ठेवत असाल तर सकाळी ते वापरून टाका. तसंच मळलेलं पीठ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये. वारंवार दोन दोन दिवसांपासूनचे पीठ खाल्ल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जर पीठ काळं दिसत असेल किंवा त्याला उग्र वास येत असेल, तर ते अजिबात खाऊ नका.
