तरुण आणि सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. हायड्राफेशियल हे आधुनिक जगातील सर्वात लोकप्रिय चेहर्यावरील उपचारांपैकी एक बनले आहे. हे आश्चर्यकारकपणे हायड्रेटिंग आहे आणि एक समान टोन्ड, चमकणारी त्वचा तयार करण्यात मदत करते. हे पूर्ण होण्यासाठी फक्त ३० मिनिटे लागतात. या अनोख्या उपकरणाचे परिणाम अगदी मायक्रोडर्माब्रेशन उपचारासारखे आहेत. या दोघांमधील फरक एवढाच आहे की ते उपचारासोबतच त्वचेला हायड्रेट करत राहते. त्याच्या आश्चर्यकारक परिणामांमुळे, अधिकाधिक लोक त्यांच्या चेहर्यावरील स्किनकेअर स्पा दिनक्रमाचा भाग म्हणून हायड्रफेशियलकडे वळत आहेत. चला जाणून घेऊया कोणती हायड्रफेसियल ट्रीटमेंट आहे ज्याच्या मागे जग वेडं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हायड्राफेशियल केल्यानंतर चेहऱ्यावरील ओलावा जवळपास आठवडाभर टिकतो, त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास ते पुन्हा करून घेता येते. हे चेहर्यावरील उपचार कोणत्याही वयात केले जाऊ शकते, परंतु तज्ञांचे मत आहे की आपण वयाच्या २५ वर्षानंतर ते केले पाहिजे. हे चेहर्यावरील उपचार अनेक टप्प्यात पूर्ण केले जाते. यात व्हॅक्यूम-आधारित वेदनारहित निष्कर्षण, हायड्रेशन, साफसफाई, एक्सफोलिएशन आणि एका मागोमाग एक लागू केलेल्या पोषक घटकांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is hydrafacial whose excessive use can worsen the complexion of the face you should know scsm
First published on: 29-11-2021 at 11:21 IST