प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गायिकेवर उपचार करणार्‍या डॉ. प्रतित समदानी यांच्या म्हणण्यानुसार, लता मंगेशकर यांचे मल्टीपल ऑर्गन फेल्यूअर अर्थात अनेक अवयव निकामी झाल्यामुळे निधन झाले. हा आजार नक्की कसा असतो आणि याची काय लक्षणं आहेत त्यापासून मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय तसेच बचाव कसा करायचा हे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय?

शरीरातील दोन किंवा अधिक अवयव एकत्र काम करणे थांबवतात या स्थितीला मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणतात. तसेच याला मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम देखील म्हणतात. हे रोगप्रतिकारक शक्तीसह संपूर्ण शरीरावर परिणाम करतात.

मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होण्याचे कारण

साइटोकिन्सचे उत्पादन रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे होते. पेशी आणि इतर कार्यांच्या विकासामध्ये सायटोकिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच ते पेशींना सूचित करून रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय ठेवतात. याव्यतिरिक्त शरीरात ब्रॅडीकिनिन प्रथिने असतात. दरम्यान शरीरात यासर्वांचे प्रमाण जास्त झाल्यास अनेक अवयव निकामी होतात. या स्थितीत शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होते. त्यामुळे शरीरात जळजळ होते. यासोबतच रक्ताच्या गुठळ्याही तयार होऊ लागतात.

हिरड्यांच्या समस्येने त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम

लक्षणे आणि बचाव

तज्ज्ञांच्या मते दिवसभर लघवी न होणे, अंग थरथरणे, श्वासोच्छवासाचा त्रास होणे, स्नायूंमध्ये वाढ होणे अशा लक्षणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. दुर्लक्ष केल्यास ते धोकादायक ठरू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is multiple organ failure know its symptoms and causes scsm
First published on: 06-02-2022 at 13:59 IST