Body acne home remedy tips : सध्या उन्हाळा सुरु आहे. या उन्हाचा त्रास होऊन अनेकांना हातावर, मानेवर किंवा पाठीवर पुरळाचा त्रास होतो. असे पुरळ बरेच वातावरणाशी संबंधीत असू शकते. परंतु अनेकांना वातावरण कसेही असले तरी, बाराही महिने पाठीवर आणि खांद्यावर पुरळ उठलेले असते. यालाच आपण ‘बॉडी ऍक्ने’ असेही म्हणू शकतो. असे पुरळ शक्यतो घाम, तेलकट त्वचा, आणि पाठीवरील मृत त्वचा यामुळे येऊ शकते अशी माहिती इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील click4su नावाच्या अकाउंटने तिच्या एका व्हिडीओमध्ये दिली आहे.

मात्र हे पुरळ किंवा ऍक्ने घालवण्यासाठी काही अतिशय सोपे असे घरगुती उपाय आहेत. तुमच्या दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलून आणि काही नवीन सवयी लावून पाठीवरील पुरळ कमी होण्यास मदत होऊ शकते असे click4su ने शेअर केलेल्या व्हिडीओवरून समजते. बॉडी ऍक्ने कमी करण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय आहेत ते पाहू.

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ

हेही वाचा : Skin care : आला आला उन्हाळा; त्वचेला ‘टॅनिंगपासून’ कसे बरे सांभाळाल? पाहा हा घरगुती फेसपॅक

पाठीवरचे पुरळ कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय :

  • आंघोळीसाठी कडक गरम पाणी वापरण्याची अनेकांना सवय असते. पाठीवर पुरळ येण्याचे ते एक कारण असू शकते. त्यामुळे शक्यतो कडक गरम पाण्याऐवजी आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे.
  • आठवड्यातील एक किंवा दिन दिवस अंघोळीदरम्यान शरीरावरील मृत त्वचा काढण्यासाठी चांगल्या किंवा घरगुती स्क्रबचा वापर करू शकता. घरगुती स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही मध, साखर कॉफी यांचा वापर करू शकता.
  • अंघोळीदरम्यान केसांवर शाम्पू आणि कंडिशनरचा वापर केल्यानंतर, एखाद्या चांगल्या बॉडीवॉशचा वापर मान आणि पाठ यांवर करावा.
  • तुम्ही झोपता त्या पलंगावरील चादर तसेच उशीचा अभ्रा / कव्हर दर आठवड्याला बदलावा. झोपताना कायम स्वच्छ उशी, पांघरूण आणि चादर यांचा वापर करावा.

हेही वाचा : Skin care : नाकावरचे ब्लॅकहेड्स चुटकीसरशी होतील गायब! घरगुती पदार्थांचा असा करा वापर; टिप्स पाहा

  • तुम्हाला जर केस मानेवर-पाठीवर मोकळे सोडायची सवय असेल, तर तसे करू नका. त्याऐवजी केसांचा छान आंबाडा किंवा बन बांधून ठेवावा.
  • तुम्ही दररीज व्यायाम करत असाल, तर व्यायामानंतर आंघोळ करावी. तसेच अंगाला चिकटून बसणारे किंवा सॅटिनचे कपडे घालणे टाळावे.
  • पाठीवर पुरळ असल्यास हलके मॉइश्चराइजर आणि ऑइल फ्री सनस्क्रीनचा वापर करावा. तसेच सुती आणि सुटसुटीत कपड्यांचा वापर करावा.
  • सर्वात शेवटी, जर तुम्हाला ‘बॅक ऍक्ने’ म्हणजेच पाठीवरील पुरळाचा खूपच त्रास होत असेल तर, त्वचा डॉक्टरांना [डर्मेटोलॉजिस्ट] दाखवून यावे.

बोनस टिप –

पाठीवरील पुरळ कमी करण्यासाठी कोरफड, काकडीचा रस, गुलाब पाणी किंवा कडुनिंबाच्या पानांचा वापरदेखील करता येऊ शकतो.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @click4su नावाच्या अकाउंटने, पाठीवरील पुरळ घालवण्याचे सोपे आणि घरगुती उपाय संगितले आहे. या घरगुती उपायांच्या व्हिडीओला आत्तापर्यंत ५५२K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

[टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]