लहान मुलांसह मोठ्यांना देखील दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दूध निरोगी राहण्यासाठी मदत करते. दुधात भरपुर प्रमाणात कॅल्शियम आढळते. कॅल्शियमसह दुधात अनेक पोषकतत्त्वे देखील आढळतात. लहान मुलांची हाडं मजबुत व्हावी यासाठी त्यांनी दररोज किमान एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण नेमक्या कोणत्या वेळी दूध प्यावे, ज्यामुळे आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरेल याबाबत अनेकांना शंका असते. लहान मुलं, तरुण मंडळी, वयस्कर व्यक्ती यांनी वयानुसार कोणत्या वेळी दूध प्यावे जाणून घ्या.

लहान मुलं

लहान मुलांनी सकाळी दूध प्यावे. तुम्ही मुलांना फुल क्रीम दूध देऊ शकता. यामुळे त्यांची दिवसभरातील कॅल्शियमची गरज पुर्ण होईल. तसेच सकाळी दूध प्यायल्याने मुलांना भरपुर ऊर्जा मिळेल, ज्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवणार नाही.

तरुण व्यक्ती
तरुणांनी देखील सकाळच्या वेळी दूध प्यावे. अनेक तरुणांना सकाळच्या वेळी व्यायाम, योगा करण्याची सवय असते. ज्यामुळे शरीराला ऊर्जेची गरज भासते. ही ऊर्जेची गरज दुधामुळे पुर्ण होऊ शकते. तसेच दिवसभरातील कामं पुर्ण करण्यासाठीही त्यांना ऊर्जा मिळेल.

आणखी वाचा: नारळ पाणी पिताना स्ट्रॉ वापरता? याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आधी जाणून घ्या

वयस्कर व्यक्ती
वयस्कर व्यक्तींनी संध्याकाळच्या वेळी दूध प्यावे. अनेक वयस्कर व्यक्तींना अपचनाचा त्रास असतो, ज्यामुळे त्यांना दूध पचायला जड जाऊ शकते. जर त्यांनी सकाळी दूधाचे सेवन केले तर त्यांना दिवसभर जड वाटू शकते. त्यामुळे त्यांनी संध्याकाळी दूध पिणे फायदेशीर ठरेल.

काही व्यक्तींना रात्री झोपण्यापुर्वी दूध पिण्याची सवय असते. ज्या व्यक्तींना रात्री झोप न लागण्याची समस्या सतावते, त्यांच्यासाठी ही सवय फायदेशीर ठरू शकते. झोपण्याआधी दूध प्यायल्याने ट्रिप्टोफैन नावाचे अमिनो ऍसिड रिलीज होते, ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)