Best Foods to eat in the morning: पालकांना अनेकदा त्यांच्या मुलाच्या आहाराची काळजी असते. त्यामुळे आपल्या मुलांना काय खायला द्यावे; जेणेकरून ती निरोगी राहतील, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. मुलांचे शरीर बळकट करण्यासाठी, सकाळी उठल्याबरोबर त्यांना रिकाम्या पोटी काही पदार्थ दिले पाहिजेत जे त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतील. मुलांचा मेंदू आणि हाडे मजबूत करण्यासाठी, तुम्ही त्यांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता, ज्यामुळे त्यांना मजबूत होण्यास मदत होईल.

कोमट पाण्याने सुरुवात

जेव्हा मुलं सकाळी उठतात तेव्हा सगळ्यात आधी त्यांना रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायला द्या, ज्यामुळे त्यांचे चयापचय वाढेल. त्यामुळे ती निरोगी राहतील आणि त्यांचे शरीर निरोगी राहील.

बदाम खायला द्या

बदाम मेंदूला तीक्ष्ण बनवून आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर मुलाला बदाम द्यावेत. जर तुमचे मूल मोठे असेल, तर त्याला रात्री पाण्यात भिजवलेले बदाम खायला द्या. जर तुमचे मूल लहान असेल, तर तुम्ही त्याला किसलेले बदामदेखील देऊ शकता.

केळी खाऊ घाला

केळी पोटासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि झिंक असते. त्यासोबतच त्यात सोडियम आणि लोहदेखील आढळते. कमी वजनाच्या मुलांना सकाळी खायला द्यावे. असे केल्याने त्यांचे वजन लवकर वाढते. एवढेच नाही, तर केळी खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.

मोरावळा खायला द्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आवळा सर्वांसाठी फायदेशीर आहे. जर तुमच्या बाळाची दृष्टी कमकुवत असेल, तर तुम्ही त्याला मोरावळा खायला देऊ शकता. त्यात मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कॅल्शियमव्यतिरिक्त आवळ्यामध्ये लोह आणि पोटॅशियमदेखील असते. त्यासोबतच त्यात व्हिटॅमिन सीदेखील चांगल्या प्रमाणात आढळते.