Yoga For Beginners: अनेकजण सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी जातात, तर बरेचजण त्यांच्या आळशीपणामुळे सकाळी व्यायाम, वॉकला जाणं टाळतात. जर तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि तरुण राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या सवयींमध्ये काही बदल करायला हवेत. तुमचा सकाळचा दिनक्रम कितीही व्यस्त असला तरी तुम्ही दररोज किमान १५ ते ३० मिनिटे स्वतःसाठी काढली पाहिजेत. या काळात तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार योगा किंवा व्यायाम करा. आज आम्ही तुम्हाला काही योगासनांबद्दल आणि व्यायामांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील.
सकाळी उठल्यानंतर ‘ही’ योगासने करा
सूर्य नमस्कार
सकाळी उठल्यानंतर सर्व वयोगटातील लोकांनी सूर्यनमस्कार करावा, हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे योगासन उगवत्या सूर्याकडे तोंड करून करावे. हे तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमचे मानसिक आरोग्यही सुधारण्यासही फायदेशीर आहे.
अधोमुख श्वानासन
सकाळच्या ताज्या वातावरणात हा व्यायाम करणे अधिक फायदेशीर आहे. असे केल्याने केवळ पाठीचा कणा मजबूत होत नाही, तर सकाळी उठल्यानंतर शरीरातील जडपणादेखील निघून जातो.
स्ट्रेचिंग
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने स्ट्रेचिंग करायला हवे. यामुळे शरीराने स्नायू मोकळे होतात. तसेच शरीर हलके वाटते. असे केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. शिवाय स्नायू मजबूत होतात.
स्क्वाट्स
जर तुमच्याकडे सकाळी जास्त वेळ नसेल, पण तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करणारा व्यायाम करायचा असेल तर तुम्ही स्क्वाट्स करावेत. असे केल्याने तुमचे स्नायू केवळ मजबूत होणार नाहीत तर तुमच्या शरीराचा आकारही परिपूर्ण होईल.