WhatsApp ने बहुप्रतीक्षित ‘डार्क मोड’ हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केलीये. व्हॉट्सअ‍ॅपचे डार्कमोड फिचर सध्या काही मोजक्या युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. अँड्राइड बीटा व्हर्जनवर काही दिवसांपूर्वीच हे फीचर उपलब्ध झालं आहे. सर्व युजर्सना हे फीचर उपलब्ध करून देण्यापूर्वी कंपनी त्याची सर्व स्तरावर चाचणी करत आहे. काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोळ्याला मोबाइल स्क्रीनमुळे होणारा त्रास निश्चितच कमी होणार आहे. रात्रीच्या वेळी मोबाइलवर पाहताना डोळ्याला त्रास होऊ नये यासाठी प्रामुख्याने या मोडचा उपयोग करण्यात येतो. हे डार्कमोड फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची जोरदार तयारी सुरू आहे. WhatsApp चे अपडेट देणाऱ्या WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. कॅमेराने काढलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करताना युजरना डार्कमोड फीचर दिसून येतंय, असं WABetaInfoने म्हटलंय. मात्र, सर्व युजर्ससाठी डार्कमोड हे फीचर कायमस्वरुपी कधीपर्यंत उपलब्ध करून दिले जाईल, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय, iOS युजर्सना मात्र या फीचरसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. iOS वरील डार्कमोड फीचर हळूहळू अंमलात आणले जाणार असून सध्या ते डेव्हलप करण्याचं काम सुरू आहे. iOS वरील डार्कमोडमध्ये सुधारणेची गरज आहे, असं WABetaInfo ने ट्विटमध्ये म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp dark mode feature finally rolling out to some users know key things sas
First published on: 26-12-2019 at 14:13 IST