व्हॉट्स अॅप हे मेसेजिंग अॅप वापरणाऱ्यांची संख्या ही जगभरात सर्वाधिक आहे. व्हॉट्स अॅपमुळे एसएमएस सेवांना मोठा फटका बसला आहे. फक्त मेसेजिंग अॅप अशी ओळख असलेल्या व्हॉट्स अॅपवर आता व्हिडिओ,व्हाइस कॉलिंगही करता येतात त्यामुळे हे अॅप युजर्सच्या सर्वाधिक पसंतीस उतरत आहे. पण, या वर्षाअखेरपर्यंत काही फोनमध्ये व्हॉट्स अॅप कायमस्वरूपी बंद होणार आहे. व्हॉट्स अॅपनं अशा फोनची यादी जाहीर केली आहे ज्या फोनमध्ये वर्षाअखेर पर्यंत व्हॉट्स अॅप पूर्णपणे बंद होणार आहे. हे फोन कोणते ते पाहू.

फेसबुक घेऊन येतंय चांगल्या आठवणींचा लेखाजोखा मांडणारं नवं पेज

– नोकीया एस ४० आणि एस ६० मध्ये या वर्षाअखेरपर्यंत व्हॉट्स बंद होणार आहे. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी नोकियानं लाँच केलेल्या ‘आशा’ या सिरिजमध्येही यापुढे व्हॉट्स अॅप बंद होणार आहे.
– त्याचप्रमाणे अँड्राईड २.१ आणि २.२ व्हर्जन असलेल्या फोनमध्येही व्हॉट्स अॅप पूर्णपणे बंद होणार आहे.
– डिसेंबर २०१८ पर्यंतच आयफोन iOS 6 ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्स अॅप सुरू राहणार आहे.
– विंडोज ८ आणि विंडोज ७ ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या फोनलाही २०१८ नंतर व्हॉट्स अॅप सपोर्ट करणार नाही.