तुम्हाला सुट्टीला बाहेर जायचं असेल तर डिंगी तंबू, धूळ भरलेल्या स्लीपिंग बॅग्स, पोर्टेबल स्टोव्ह आणि फ्रीजमध्ये सुकवलेली स्पॅगेटी असायलाच पाहिजे असे नाही. त्याऐवजी, तुम्ही इजिप्शियन कॉटन शीट्स, फाइव्ह स्टार ब्रेकफास्ट आणि कॉन्सिएर्ज सेवा न सोडता अमेरिकेच्या अविस्मरणीय नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. कठीण स्थितीत राहणं तुम्हाला आवडत नसेल आणि तरीही तुम्हाला ताजी हवा हवी असेल तर यातील काही आलीशान हॉटेल्समध्ये बुकिंग करा, जी अमेरिकेतल्या सर्वांत देखण्या लँडस्केप्समध्ये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅजेस्टिक योसेमाइट हॉटेल, कॅलिफोर्निया
कॅलिफोर्नियातील योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये असलेले हे ऐतिहासिक स्थान तुम्हाला पार्कच्या सौंदर्याचा आनंद जागतिक दर्जाच्या सेवेसह घेण्याची संधी देते. १९२७ साली उद्घाटन झालेले मॅजेस्टिक योसेमाइट हॉटेलच्या आर्किटेक्चरल घटक आणि डेकोरमध्ये तुम्हाला पार्कचे टोकदार सुळके, धो-धो वाहणारे धबधबे आणि सुंदर झाडांचा आनंद घेता येईल. भलेमोठे प्रवेशद्वार, लाकडी स्लॅब दरवाजे आणि फ्लोअर ते सीलिंग खिडक्या तुम्हाला ओळखीच्या वाटतील, कारण स्टॅनली कुब्रिकच्या ख्यातनाम हॉरर चित्रपट दि शायनिंगच्या काही दृश्यांचे चित्रिकरण येथे कऱण्यात आले होते. दरम्यान, यातील मोठ्या डायनिंग रूममध्ये कॉर्नर अल्कोव्ह खिडकीतून योसेमाइट फॉल्सचे सुंदर दृश्य दिसते. हे हॉटेल केंद्रस्थानी स्थित आहे. त्यात हायकिंग ट्रेल्स, योसेमाइट फॉल्स आणि इतर बाहेरच्या उपक्रमांचा आनंद अगदी दाराबाहेर लगेच घेता येतो. हॉटेलमधील कर्मचारी पार्क तसेच घोड्यावरील राईड आणि उतर उपक्रमांसाठी टूर्सचे आयोजन करू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where to find luxury in the us
First published on: 08-04-2019 at 18:39 IST