Which Fruit Relieve Constipation Fast : बद्धकोष्ठता हा त्रास बहुतेक सर्व वयोगटातल्या लोकांना होताना दिसून येतो. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार यांच्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे बहुतेक लोकांना अधूनमधून बद्धकोष्ठतेचा त्रास होतच असतो; भरपूर पाणी पिऊन आणि फायबर खाऊनही आळस, पोट फुगणे अशा समस्या जाणवतात; जर असे तुमच्या बरोबर सुद्धा होत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. काही संशोधकांनी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी एक फळ शोधून काढलं आहे; त्याचबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊयात…
बद्धकोष्ठतेवरील पहिल्या पुराव्यावर आधारित आहार मार्गदर्शक तत्त्वांचा भाग म्हणून प्रकाशित झालेल्या किंग्ज कॉलेज लंडनच्या एका ऐतिहासिक पुनरावलोकनात, दिवसातून दोन ते तीन किवी खाल्ल्याने चांगले परिणाम दिसू लागतात. तर किवी पचनक्रिया सुलभ करण्यासाठी कसे काम करते, आपण कशाप्रकारे सेवन केले पाहिजे तेही पाहूया…
संशोधनातून काय दिसून येते?
- ब्रिटिश डायटेटिक असोसिएशन (BDA) च्या अभ्यासानुसार आणि ७५ हून अधिक क्लिनिकल चाचण्यांचा आढावा घेतल्यावर असे आढळून आले की, किवी फळे खाणे, खनिजयुक्त पाणी आणि राईचा ब्रेड खाणे यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.
- लंडनच्या किंग्ज कॉलेज अभ्यासानुसार कीवीमध्ये फायबर भरपूर असते. फायबर मलाला फुगवते, त्यामुळे त्याचे प्रमाण वाढवते. तर कीवीतील फायबर पाणी धरून ठेवते, त्यामुळे मल मऊ आणि ओलसर राहतो; ज्यामुळे आतड्यांचे आकुंचन होण्यास मदत होते; असे प्रमुख लेखिका डॉक्टर एरिनी दिमिदी यांनी नमूद केले.
- दुसऱ्या एका संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की, किवीमध्ये विरघळणारे ( पाण्यात विरघळणारे) आणि अघुलनशील (पाण्यात न विरघळणारे) असे दोन्ही फायबर असतात. त्याशिवाय त्यात अॅक्टिनिडिन नावाचा एक खास पचनाला मदत करणारा एन्झाइमही असतो; जो एकत्रितपणे पचन जलद सुधारू शकतो आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करू शकतो.
- थोडक्यात, केवळ फायबर खाल्ल्याने नेहमी अपेक्षित आराम मिळत नाही. पण कीवीबद्दल नवीन संशोधन असेही सांगते की, यामुळे आतड्यांची कार्यक्षमता सुधारू शकते.
किवी खाण्याचे आरोग्यदायी फायदे –
दुहेरी फायबर – किवीमध्ये अघुलनशील (जे मलचे प्रमाण वाढवते) आणि विरघळणारे फायबर (जे मल मऊ करते आणि हालचाल करण्यास मदत करते) दोन्ही असतात.
एन्झाइमची – किवीमधील अॅक्टिनिडिन एन्झाइम प्रथिनांच्या पचनास मदत होते; ज्यामुळे आतड्यांवरील भार कमी होतो आणि हालचाल सुधारते.
हायड्रेशन – फळात नैसर्गिकरित्या पाणी असते; ज्यामुळे मल मऊ होतो आणि सहजतेने बाहेर पडतो.
पोषक तत्वे – गोड फळांप्रमाणे, किवीमुळे पचनक्रियेत कोणताही बदल होत नाही.
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहाराचा एक भाग म्हणून दिवसातून २ ते ३ किवी खाण्याची शिफारस तज्ज्ञ करताना दिसत आहेत.
तुमच्या आहारात किवीचा कसा वापर करायचा?
कमीतकमी ४ आठवडे दररोज २ लहान आकाराचे किवी (एकूण अंदाजे २००-२५० ग्रॅम) खा आणि निरीक्षण करा.
नाश्त्ता किंवा दुपारी जेवणाबरोबर किवी खा.
आतड्यांवरील हालचाल वाढवण्यासाठी हायड्रेशन आणि सौम्य हालचाली (जसे की १० मिनिटे चालणे) करा.
किवीच्या फळाच्या वरचे साल यामध्ये अतिरिक्त फायबर असते.
पुरेसे पाणी, कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न आणि नियमित शारीरिक हालचाली करून तुम्ही बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवू शकता.
काय लक्षात ठेवावे?
- जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, मलमध्ये रक्त येत असेल, वजन कमी होत असेल, वेदना होत असतील किंवा आतड्यांमध्ये अचानक बदल होत असेल त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- किवी सौम्य असली तरीही तुम्हाला रक्तदाब किंवा इतर आजारांसाठी औषधे घेत असाल तर सांभाळून रहा. कारण – या फळामध्ये पोटॅशियम भरपूर असते.
- काही लोकांना जास्त प्रमाणात किवी खाल्ल्यास एन्झाइमला थोडीशी संवेदनशीलता जाणवू शकते.
- जर तुम्हाला किवी खाताना सतत मुंग्या येणे किंवा तोंडात जळजळ जाणवली तर लगेच किवी खाणे थांबवा.
जर जास्त फायबर असलेला आहार घेऊनही सुधारणा जाणवली नसेल, तर आता त्या हिरव्या, केसाळ कीवी फळांकडे वळण्याची वेळ आली आहे असे समजा शकते. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार कीवी फळ हे फक्त चविष्ट स्नॅक नाही, तर दीर्घकाळच्या बद्धकोष्ठतेत खरोखर परिणाम देणाऱ्या उपायांपैकी एक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही किवीचा समावेश करू शकता.
