Antioxidant Rich Foods : जेव्हा ॲटी-ऑक्सिडेंटचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकजण हेच सांगतो की, यांचे सेवन आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. पण, ॲटी-ऑक्सिडेंटचे शरीराला काय फायदे होतात; याबद्दल अनेकांना माहितीच नसते. तर अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करतात. मुक्त रॅडिकल्स वृद्धत्व आणि अनेक रोगांसाठी जबाबदार असतात. अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या पेशी, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात; ज्यामुळे चांगले आरोग्य राहण्यास मदत होते. तर बरेच लोक आहारामध्ये अँटिऑक्सिडेंट्सचा समावेश करण्यासाठी डाळिंबाचे सेवन करतात.
पण, बाजारात असे अनेक पदार्थ आहेत; ज्यात डाळिंबापेक्षाही जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. येथे, आम्ही तुम्हाला अशा सात पदार्थांबद्दल सांगणार आहोत; ज्यामुळे तुमचे हृदय, मेंदू, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास देखील मदत होईल.
ब्लूबेरी – ब्लूबेरीला अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस मानले जाते. त्यात अँथोसायनिन्स नावाचे संयुग असतात; जे जळजळ कमी करण्यास मदत करून हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी करतात. यामुळे ब्लूबेरीचे नियमित सेवन केल्याने ताण देखील कमी होऊ शकतो.
ग्रीन टी – ग्रीन टीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात; जे शरीरातील जळजळ कमी करतात. ग्रीन टीमध्ये विशेषतः कॅटेचिन नावाचे संयुगे असतात; जे मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात आणि चरबी जाळण्यास मदत करतात. जर तुम्ही दररोज सेवन केल्यास चयापचय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरू शकतात.
राजमा – राजमा अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. बाजारात अगदी स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या राजमाच्या बिया शरीराचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करतात आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारतात. त्यांचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामध्ये फायबर आणि प्रथिने देखील भरपूर असतात.
डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात; जे रक्ताभिसरण सुधारण्यास, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल (LDL) ला ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून देखील सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.
गोजी बेरी – गोजी बेरी त्यांच्या चमकदार नारिंगी-लाल रंगासाठी ओळखल्या जातात. त्यामध्ये झेक्सॅन्थिन आणि बीटा-कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात; जे डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पॉलिसेकेराइड्स देखील असतात; जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
अक्रोड – अक्रोडमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यात पॉलीफेनॉल, व्हिटॅमिन ई सुद्धा; जे शरीरातील चरबीचे ऑक्सिडेशनपासून संरक्षण करतात. शिवाय, अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात; जे जळजळ कमी करतात. त्यांचे सेवन केल्याने तुमच्या मेंदूला चालना मिळू शकते.
