Eco Friendly Ways To Store Used Tea Leaves : आपल्यातील बरेच जण दररोज सकाळी, संध्याकाळी चहा, ग्रीन टीचे सेवन करता. चहा तयार झाल्यावर तो गाळून घेतला की, चहा पावडर आपण फेकून देतो. पण, यामुळे नकळतपणे आपण अनेक घरगुती उपाय फेकून देतो आहोत हे कदाचित आपल्या लक्षातच येत नाही. वापरलेल्या चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, टॅनिन आणि सौम्य अॅब्रेसिव्हने भरलेली असतात; जी तुमच्या घरासाठी, बागेसाठी आणि अगदी तुमच्या त्वचेसाठीही जादूई सुद्धा ठरतात.
जर तुम्हाला कचरा कमी करायचा असेल, पैसे वाचवायचे असतील आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत थोडासा बदल करायचा असेल तर बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
१. बाल्कनीतील झाडे – चहाच्या पावडरमध्ये नायट्रोजन आणि वनस्पतींसाठी उपयुक्त असे इतर सूक्ष्म खनिजे असतात. त्यामुळे चहाची पावडर तुम्ही कुंडीच्या मातीत मिसळा किंवा तळाशी हलकेच शिंपडा. यामुळे मातीमध्ये हवा खेळती आणि झाडांच्या मुळांना निरोगी ठेवण्यास मदत होते. फक्त लक्षात ठेवा की, त्या पानांमध्ये दूध किंवा साखर नसावी, फक्त चहा पावडर असावी.
२. फ्रिज, शूज, स्वयंपाकघरातील डबे – चहा पावडर ही नैसर्गिक सुगंध निर्माण करणारे स्पंज आहेत. चहा पावडर पूर्णपणे वाळवा, नंतर एका लहान पिशवीत किंवा वाटीत ठेवून द्या. त्यानंतर फ्रिजमध्ये वाटी आणि शूजमध्ये पिशवी ठेवून द्या. यामुळे रसायनांशिवाय दुर्गंधी शोषून घेतील आणि हलका, मातीसारखा सुगंध पसरतो.
३. केस मऊ आणि चमकदार दिसणार – तुमच्या आजीला कदाचित ही युक्ती माहित असेल. शॅम्पू लावल्यानंतर थंड केलेल्या काळ्या किंवा हिरव्या चहाच्या पावडरने तुम्ही तुमचे तुमचे केस धुवू शकता. ही पद्धत केसांची चमक वाढवते, केसांची मुळे मजबूत करतात आणि टाळूचा तेलकटपणा दूर करतात. यामध्ये चहामधील टॅनिन केसांच्या क्यूटिकलला घट्ट करतात; ज्यामुळे केस गुळगुळीत होतात.
४. कीटकांपासून रहाल दूर – मुंग्या आणि डास दूर करण्यासाठी ओली चहापावडर खिडक्यांच्या काचा, स्वयंपाकघरातील कोपऱ्या किंवा बागेच्या जागी पसरवा. या सुगंधामुळे तुमच्या झाडांना किंवा घरातील हवेच्या गुणवत्तेला हानी पोहचवणरे कीटक दूर राहतात. तसेच तुम्ही त्यात सिट्रोनेला किंवा लैव्हेंडर तेलाच्या काही थेंब सुद्धा मिसळू शकता.
५. लाकडी फर्निचरसाठी वापर – वापरलेली चहा पावडर लाकडाच्या पृष्ठभागांसाठी एक चमकदार नैसर्गिक पॉलिश ठरते. मऊ कापडाने फर्निचर घासून घ्या; ते घाण साफ करते आणि एक उबदार, सूक्ष्म चमक आणते. गडद लाकडी टेबल, कॅबिनेट आणि फरशीवर सुंदरपणे काम करते.
साफसफाईपासून ते कंपोस्टिंगपर्यंत, चहा पावडर असंख्य गोष्टींसाठी उपयोगी आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा सकाळचा चहा किंवा ग्रीन टी बनवाल तेव्हा चहा पावडर टाकू नका, पुन्हा वापरा आणि त्याचा आनंद घेऊ नका.
