‘बजेट’ स्मार्टफोन सेगमेंटमध्ये Tecno ने आपला नवीन स्मार्टफोन Tecno Spark Power 2 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे गेल्या वर्षी आलेल्या Tecno Spark Power या फोनची पुढील आवृत्ती आहे. या फोनची खासियत म्हणजे यामध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पॉवरफुल बॅटरीमुळे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर फोन चार दिवसांचा बॅकअप देतो असा कंपनीचा दावा आहे. तसेच,  ‘7 इंच एचडी+ डिस्प्ले’ इतका मोठा डिस्प्ले असून फोनच्या मागील बाजूला ट्रिप कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंमत :-
9,999 इतकी या फोनची किंमत ठेवण्यात आली असून फ्लिपकार्टवरुन हा फोन खरेदी करता येईल. Ice Jadeite आणि मिस्टी ग्रे अशा दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. 23 जून रोजी दुपारी 12 वाजता या फोनसाठी फ्लिपकार्टवर पहिला सेल आयोजित केला जाणार आहे.

फीचर्स :-
या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P22 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आलं आहे. 7 इंच एचडी+ डिस्प्ले असलेल्या Tecno Spark Power 2 मध्ये कंपनीने फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलाय. यातील 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर अन्य दोन कॅमेरे 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी वॉटरड्रॉप नॉचच्या आतमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह हा फोन लाँछ करण्यात आला असून मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 256जीबीपर्यंत वाढवता येईल. फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक या फीचर्ससह या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-सिम सपोर्ट, ड्युअल 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5 आणि माइक्रो युएसबी पोर्ट मिळेल.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With 6000mah battery and 7 inch large display tecno spark power 2 launched in india know price and specifications sas
First published on: 17-06-2020 at 17:15 IST