तुम्ही पाणी बसून पिता की उभं राहून? जर तुमचे उत्तर उभं राहून असे असेल तर वेळीच सावध व्हा. कारण अशाप्रकारे उभं राहून पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेकजण उभ्यानेच पाणी पितात मग ते ऑफीस असो घर असो किंवा प्रवासात पाणी पिणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र वेळीच ही सवय मोडणे आरोग्यासाठी योग्य ठरेल… उभ्याने पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणकोणते धोके आहेत जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांधेदुखी:

उभ्यानेच आणि घाईघाईने पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक क्रॅम्प येणे किंवा सांधे दुखणे यासारख्या लक्षणांपासून या आजाराची सुरुवात होते आणि मग हा सांधेदुखीचा त्रास आयुष्यभराचा सोबती होतो.

पचनाचे विकार:

जेव्हा तुम्ही उभ्याने पाणी पिता तेव्हा ते थेट अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

तहान भागत नाही:

उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.

पचनाला कठीण:

उभं राहून पाणी प्यायलास शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.

किडनीचे आजार:

उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते.

शरीरातील आम्ल पदार्थांचे प्रमाण कमी होत नाही:

आयुर्वेदामध्ये नमूद केल्याप्रमाणे पाणी उभ्याने आणि घाईघाईमध्ये पिऊ नये. पाणी शांतपणे बसून प्यावे. असे केल्यास शरीरामधील आम्लाच्या (अॅसिडच्या) प्रमाणात समतोल राखला जातो. उभ्याने पाणी प्यायल्यास शरीरातील इतर द्रव्यांबरोबर ते मिसळत नाही. या उलट बसून पाणी प्यायल्यास ते योग्य प्रमाणत शरीरातील आम्ल पदार्थांबरोबर मिसळून त्या पदार्थांचे शरीरातील समतोल राखण्यास मदत करते.

जळजळीचा त्रास:

उभ्याने पाणी प्यायलेले ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगावल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो.

बसून पाणी प्यायल्यास जास्त आराम मिळतो:

उभे राहून पाणी पिताना शरीर ‘फाईट अॅण्ड फाईट’ मोडवर असते. म्हणजेच उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. पण तुम्ही बसून पाणी प्यायल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक (स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणारे काम) प्रक्रिया आराम आणि पचन मोडवर असते. त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World water day 8 reasons you should never drink water while standing
First published on: 22-03-2019 at 13:16 IST