जगातील पहिला दोन स्क्रीन (World’s First Dual Screen)असलेला 85 इंचाचा 8K Pro टीव्ही लाँच झालाय. हा टीव्ही चीनच्या Hisense कंपनीने बाजारात आणलाय. Hisense 85U9E TV या प्रीमियम टेलिव्हिजनमध्ये 8K रिझोल्युशन डिस्प्ले असून हा टीव्ही 120Hz हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टीव्हीची खासियत म्हणजे यामध्ये दोन डिस्प्ले आहेत. gizmochina च्या वृत्तानुसार, या टीव्हीमधील प्रायमरी डिस्प्ले 85 इंचाचा आणि सेकंडरी 28 इंचाची असिस्टंट स्क्रीन आहे. मोठ्या डिस्प्लेखाली छोटा डिस्प्ले असून हा लहान डिस्प्ले व्हॉइस कमांड्सला सपोर्ट करतो, तसेच दुसरे नोटिफिकेशन्सही दाखवतो.
Hisense 85U9E टीव्हीमध्ये बॅकलाइट कंट्रोल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून AI कंप्युटिंग पॉवर आणि HDR अल्गोरिदमचा सपोर्टही देण्यात आला आहे. याद्वारे, विविध सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ऑप्टिमाइझेशंसमुळे टीव्ही पाहण्याचा दर्जेदार अनुभव मिळतो. 120Hz डिस्प्ले पॅनलच्या या टीव्हीमध्ये तुम्ही हाय फ्रेम रेट चित्रपटांचा दर्जेदार अनुभव मिळतो, तसेच या कंसोल किंवा AAA टायटल्ससह पीसी गेमिंगचा पर्यायही टीव्हीमध्ये आहे. हा टीव्ही 120Hz हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. बॅकलाइट कंट्रोल चिप या टीव्हीमध्ये असून ड्युअल कोर AI सिस्टिम आणि ड्युअल कोर इमेजिंग इंजिन आहे. यामुळे टेलिविजन कॉम्प्लेक्स अल्गोरिदमद्वारे डिस्प्लेमध्ये रिअल टाइम चेंज करता येतो. कलर अॅक्युरसीच्या बाबतीत हा टीव्ही आयफोनवरही मात करतो असे कंपनीचे म्हणणे आहे.
किंमत – 79,999 युआन म्हणजे जवळपास 8.5 लाख रुपये इतकी किंमत या Hisense 85U9E टीव्हीची ठेवण्यात आली आहे.