Remedies For Itchy Skin In Rainy Season: पावसाळा म्हटलं की, पावसासोबत अनेक आजारही येतात. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे घाम आणि पावसाचे पाणी एकत्र आल्याने त्वचेवर पुरळ आणि खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. अशावेळी काही केमिकलयुक्त क्रीम्स किंवा जेल लावण्याऐवजी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. ज्याने तुम्हाला बराच फायदा मिळेल. तर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी जाणून घेऊया काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय ज्यांची मदत घेऊन तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसात त्वचेवरील खाज सुटण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय करा

लिंबू आणि बेकिंग सोडा

पावसाळ्यात त्वचेला खाज सुटल्यास आंघोळ करताना एका भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबू पाणी घालून पेस्ट बनवा. ते तुमच्या त्वचेवर चांगले लावा आणि ५ ते १० मिनिटे असंच त्वचेवर राहू द्या. त्यानंतर आपली त्वचा धुवा. हे दररोज एकदा करा. त्वचेवर येणारी खाज काही दिवसांमध्ये कमी झालेली दिसेल.

( हे ही वाचा: पावसात भिजणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर; मिळतील आश्चर्यकारक फायदे)

चंदन पेस्ट

त्वचेवर चंदनाचा वापर करणे खूप फायदेशीर मानले जाते. हा उपाय करण्यासाठी बाजारात मिळणारे चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळून खाज येणा-या भागावर लावा. असे नियमित केल्याने खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.

कडुलिंबाचा वापर

खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठीही कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. खाज सुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून त्याचा प्रादुर्भाव झालेल्या भागावर लावा. याने बराच फायदा मिळेल.

( हे ही वाचा: व्हायरल ताप असल्यास लगेच औषधे खाऊ नका; जाणून घ्या लवकर बरं होण्यासाठी सर्वात सोपा उपाय)

नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यासाठी तसेच त्वचेचे संक्रमण दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पावसाळ्यात खाज सुटत असेल तर बाधित भागावर खोबरेल तेल लावावे. त्वचेवर येणारी खाज लगेच कमी होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worried about itchy skin during monsoons these home remedies will give instant relief gps
First published on: 25-07-2022 at 12:18 IST